"ई-वॉलेट'ने करा झटपट व्यवहार! 

Ewallet fast payment
Ewallet fast payment

ई-वॉलेट हा सध्या कॅशलेस व्यवहारांसंबंधीचा सर्वांत जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे आपले पैशांचे पाकीट किंवा आपली पर्स "कॅशलेस' ठेवायची आणि त्याऐवजी इंटरनेटवर आपले पैसे ठेवायचे. त्यानंतर ते लागतील तसे, लागतील तिथे वापरायचे! यासाठी "ई-वॉलेट' सुविधा पुरविणाऱ्या पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज यांच्यासारख्या कंपन्यांच्या वेबसाइटवर आपल्याला आपले खाते (म्हणजेच ई-वॉलेट) उघडावे लागते. यासाठी काहीही पैसे पडत नाहीत. त्यानंतर आपल्या मूळ बॅंक खात्यातून किंवा क्रेडिट वा डेबिट कार्डातून आपण या वेबसाइटवरच्या खात्यात पैसे वळवू शकतो. जेव्हा आपण कोणतीही खरेदी करू किंवा इतर कोणाला आपल्याला पैसे पाठवायची वेळ येईल, तेव्हा या "ई-वॉलेट' खात्यातून आपण पैसे पाठवू शकतो. आपल्या मोबाईल नंबरशी हे खाते जोडलेले असल्यामुळे ते इतर कोणी वापरू शकत नाही. तसेच ते सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला पासवर्ड किंवा पिन असतो. स्मार्टफोनवरून तर हे वॉलेट अगदी लीलया वापरता येते. आता रस्त्यावरील अनेक फेरीवालेसुद्धा "ई-वॉलेट' या पर्यायाचा वापर करताना दिसत आहेत. म्हणजेच आपण त्यांच्याकडून काही खरेदी केली, तर आपल्या "ई-वॉलेट'मधून आपल्या स्मार्टफोनच्या साह्याने आपण त्या दुकानदाराच्या "ई-वॉलेट'मध्ये अक्षरश: काही सेकंदांमध्ये पैसे पाठवू शकतो. सर्व व्यवहारांची चोख नोंद असल्यामुळे फसवाफसवीचा प्रकार घडू शकत नाही. भारत सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्या वतीने "यूपीआय' नावाच्या तंत्रज्ञानावर आधारित असलेले "ई-वॉलेट'सुद्धा उपलब्ध आहे. दुर्दैवाने सर्व बॅंका यासाठी आपापल्या सुविधा पुरवित असल्यामुळे त्यात अजून एकवाक्‍यता नाही. साहजिकच "पेटीएम'सारख्या खासगी कंपन्यांनी यात सध्या आघाडी घेतली आहे. कदाचित लवकरच हे चित्र बदलेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com