अभिनयाच्या क्षेत्रात सर्व आघाड्यांवर यशस्वीपणे आपली छाप पाडणारा एक महान अभिनेता... अशी सर्वमान्यता असताना खासगी आयुष्यात आणि सार्वजनिक जीवनात वावरताना समाजशील राहणं मोजक्या लोकांनाच जमतं. वैयक्तिक संपर्कात आलेल्या प्रत्येक सामान्य माणसासह सेलिब्रिटींवरही आपली तेवढ्याच सहजपणे छाप पाडणारे ओम पुरी यांची आयुष्याच्या रंगमंचावरून अचानकपणे झालेली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावणारी आहे.
ओम पुरी यांनी कलात्मक, समांतर सिनेमापासून ते व्यावसायिक चित्रपटांत अपारंपरिक भूमिका साकारत अशा दोन्ही प्रकारांमध्ये यश मिळवले. 'ओम पुरी- अनलाईकली हीरो' या चरित्रातून 2009 मध्ये त्यांची पत्नी नंदिता पुरी यांनी आपल्या खासगी गोष्टी उघड केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र, वैयक्तिक आय़ुष्यातील वादांचा परिणाम त्यांनी कारकिर्दीवर होऊ दिला नाही.
ओम पुरी यांनी हॉलिवूडमध्येही यशस्वीपणे काम केले आहे. भारताबाहेर ब्रिटीश आणि अमेरिकन सिनेसृष्टीमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला. तेथील प्रेक्षकांवरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. तरुणाईतील उमेद अखेरपर्यंत कायम राखत कारकिर्दीच्या सुरवातीपासून ते अखेरपर्यंत त्यांनी आपला अभिनय अधिकाधिक खुलवला. 'द रिलक्टंट फंडामेंटॅलिस्ट', 'ईस्ट इज ईस्ट' या हॉलिवूडपटांमध्ये ओम पुरी यांनी अभिनयाची झलक दाखवली. अगदी 2014 मध्ये हेलेन मिरेनसोबत त्यांनी स्टीवन स्पीलबर्ग आणि ऑप्रा विनफ्रे यांची निर्मिती असलेल्या 'द हंड्रेड फूट जर्नी' या विनोदी चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षात राहणारी आहे.
ओम पुरी यांच्या कारकिर्दीचे वर्णन त्यांच्या गाजलेल्या संवादांशिवाय अपूर्णच राहील. त्यांचे गाजलेले निवडक डायलॉग-
अर्धसत्य, आक्रोश, मिर्चमसाला, जाने भी दो यारो, द्रोहकाल, धारावी, हेराफेरी, चाची-420, माचीस, मुंबई एक्सप्रेस अनेक चित्रपटांमधून त्यांनी अत्यंत वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. जितक्या प्रभावीपणे ते गंभीर भूमिका वठवत असत तितक्याच सहजपणे ते विनोदी भूमिकांतून प्रेक्षकांना हासवत असत.
नवखा कलाकार वा चॉकलेट हीरो असो पुरी त्यांना सांभाळून घेत, तसेच आघाडीची हिरॉईन असो, अथवा सुपरस्टार अभिनेता असो त्यांच्यासोबत तितक्याच सहजपणे आपली वेगळी छाप पाडत 'स्क्रीन' व्यापून टाकणारा अभिनेता म्हणजे ओम पुरी. नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर, अंबरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर यांबरोबरच अनेक तुल्यबळ नटांसोबत ओम पुरींच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे ही रसिक प्रेक्षकांसाठी एक 'ट्रीट' ठरते. AK-47, गुप्त, आघात, नासूर, अर्धसत्य या चित्रपटांत त्यांनी सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत केलेल्या भूमिका उल्लेखनीय आहेत. त्याचप्रमाणे 'मालामाल वीकली' मधील धमाल विनोदी भूमिका त्यांनी किती सहज साकारलीय यातून त्यांचे अभिनय कौशल्य विशेष अधोरेखित होते. 'पत्थर'मधील अनुराधा पटेल आणि ओम यांची जोडी लक्षात राहिली. 'बहू की आवाज' चित्रपटामध्ये सुप्रिया पाठक यांच्यासोबतही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे भूमिका वठवली.
इतर माहिती :
जन्म
18 ऑक्टोबर 1950, अंबाला, (हरियाना)
बालपण
शिक्षण
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.