बेळगावच्या विमानसेवेस अच्छे दिन

belgav airport news
belgav airport news

ब्रिटिशांच्या राजवटीत स्थापन झालेल्या बेळगावच्या सांबरा विमानतळाने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. गतवर्षी केंद्र सरकारच्या ‘उडान ३’ या योजनेत समावेश झाल्यानंतर विमानतळाचे भाग्यच पालटले. बेळगाव विमानतळावरून आता रोज १५ विमानफेऱ्या सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगावहून कोणी महनीय व्यक्ती विमानाने जाणार असेल तर त्यांना हुबळीपर्यंत जाऊन तेथून विमान प्रवास करावा लागायचा. आता हुबळीलाही मागे टाकत बेळगावने अनेक मोठ्या शहरांशी संपर्क सुरू केला आहे.

बेळगावच्या विमानतळावर टर्मिनल इमारत उभारण्यात आली. त्यानंतर ‘उडान’मधून येथील विमानसेवा वाढतच गेली. गेल्याच आठवड्यात येथून हैदराबाद, तिरुपती, म्हैसूर या शहरांसाठी सेवा सुरू झाली. विशेष म्हणजे, या शहरांना जाण्यासाठी आता आरामबसच्या दरात प्रवास घडू लागला आहे. त्यामुळे येथे प्रवाशांची संख्याही वाढत आहे. हुबळीपासून ते कोल्हापूरपर्यंतच्या प्रवाशांना बेळगाव हे सोयीचे ठरले आहे. जवळच्या काही शहरांनाही विमानसेवा देण्यात येणार आहे. त्यामध्ये बेळगाव - कोल्हापूर ही सेवा दृिष्टपथात आहे. त्यामुळे लवकरच बेळगाव-कोल्हापूर हा प्रवासही विमानाने होईल.

विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार झाल्याने एअरबस ३२० अशा प्रकारची मोठी विमाने उतरण्याची व्यवस्था झाली आहे. पाच विमानेही येथे पार्क करता येऊ शकतील. येथे रात्रीही विमान उतरण्याची व्यवस्था आहे. खराब हवामान, धुके आणि मुसळधार पावसात विमानांना दिशादर्शक ठरणारी आयएलएस ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असून, आगामी दोन महिन्यांत ती कार्यरत होईल. वायू दलाच्या अखत्यारित हे विमानतळ असल्याने सुरक्षेबाबत नेहमी ॲलर्ट असते. आता बेळगावातून दिल्ली व चेन्नई या शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी बेळगावचे नेते व विमानतळ प्राधिकारण प्रयत्नशील आहे. प्रवाशांसाठी सांबरा विमानतळावरून बेळगाव बसस्थानक, रेल्वेस्थानक, उद्यमबाग अशा महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत बससेवाही उपलब्ध केली आहे.

विमानतळ विस्तारीकरणावेळी स्थानिक शेतकरी व प्रशासन असा वाद संपल्याने बेळगावच्या विमानसेवेला अच्छे दिन आले आहेत. आता विमानतळाच्या नामकरणावरून चर्चा सुरू झाली आहे. सांबरा या गावामध्ये विमानतळ व हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र असल्याने या विमानतळाला सांबरा विमानतळ म्हणूनच ओळखले जाते. परंतु, अलीकडे केंद्र सरकार देशातील काही विमानतळांची नावे बदलणार आहे. त्यात बेळगावचाही समावेश असून, त्यासाठी राज्य सरकार प्रस्ताव पाठवणार आहे. नाव काहीही होवो, बेळगावने हवाई सेवेमध्ये महत्त्वाचा गाठलेला टप्पा कायम राहावा, ही अपेक्षा.

दृिष्टक्षेपात
 एअरबस ३२० अशी मोठी विमाने उतरण्याची व्यवस्था 
 पाच विमाने पार्किंगची व्यवस्था  रात्री विमान उतरण्याचीही व्यवस्था
 खराब हवामान दिशादर्शक ठरणारे आयएलएस बसवण्याचे काम सुरू 
 स्पाईस जेट, अलायन्स, इंडिगो, स्टार, ट्रू जेट या कंपन्यांकडून सेवा
 मुंबई, बंगळूर, हैदराबाद, इंदूर, अहमदाबाद, पुणे, तिरुपतीला उड्डाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com