"जब एक सच्चा आदमी मरता है तो..."

संग्राम शिवाजी जगताप
बुधवार, 11 जानेवारी 2017

ओम पुरी यांनी कलात्मक, समांतर सिनेमापासून ते व्यावसायिक चित्रपटांत अपारंपरिक भूमिका साकारत अशा दोन्ही प्रकारांमध्ये यश मिळवले. 'ओम पुरी- अनलाईकली हीरो' या चरित्रातून 2009 मध्ये त्यांची पत्नी नंदिता पुरी यांनी आपल्या खासगी गोष्टी उघड केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र, वैयक्तिक आय़ुष्यातील वादांचा परिणाम त्यांनी कारकिर्दीवर होऊ दिला नाही. 

अभिनयाच्या क्षेत्रात सर्व आघाड्यांवर यशस्वीपणे आपली छाप पाडणारा एक महान अभिनेता... अशी सर्वमान्यता असताना खासगी आयुष्यात आणि सार्वजनिक जीवनात वावरताना समाजशील राहणं मोजक्या लोकांनाच जमतं. वैयक्तिक संपर्कात आलेल्या प्रत्येक सामान्य माणसासह सेलिब्रिटींवरही आपली तेवढ्याच सहजपणे छाप पाडणारे ओम पुरी यांची आयुष्याच्या रंगमंचावरून अचानकपणे झालेली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावणारी आहे. 

ओम पुरी यांनी कलात्मक, समांतर सिनेमापासून ते व्यावसायिक चित्रपटांत अपारंपरिक भूमिका साकारत अशा दोन्ही प्रकारांमध्ये यश मिळवले. 'ओम पुरी- अनलाईकली हीरो' या चरित्रातून 2009 मध्ये त्यांची पत्नी नंदिता पुरी यांनी आपल्या खासगी गोष्टी उघड केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र, वैयक्तिक आय़ुष्यातील वादांचा परिणाम त्यांनी कारकिर्दीवर होऊ दिला नाही. 

ओम पुरी यांनी हॉलिवूडमध्येही यशस्वीपणे काम केले आहे. भारताबाहेर ब्रिटीश आणि अमेरिकन सिनेसृष्टीमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला. तेथील प्रेक्षकांवरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. तरुणाईतील उमेद अखेरपर्यंत कायम राखत कारकिर्दीच्या सुरवातीपासून ते अखेरपर्यंत त्यांनी आपला अभिनय अधिकाधिक खुलवला.

'द रिलक्टंट फंडामेंटॅलिस्ट', 'ईस्ट इज ईस्ट' या हॉलिवूडपटांमध्ये ओम पुरी यांनी अभिनयाची झलक दाखवली. अगदी 2014 मध्ये हेलेन मिरेनसोबत त्यांनी स्टीवन स्पीलबर्ग आणि ऑप्रा विनफ्रे यांची निर्मिती असलेल्या 'द हंड्रेड फूट जर्नी' या विनोदी चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षात राहणारी आहे. 

ओम पुरी यांच्या कारकिर्दीचे वर्णन त्यांच्या गाजलेल्या संवादांशिवाय अपूर्णच राहील. त्यांचे गाजलेले निवडक डायलॉग

 • जब एक करप्ट आदमी मरता है तो उस की सत्ता खतम होती है... और जब एक सच्चा आदमी मरता है तो उस की सत्ता शुरू होती है!  (घायल वन्स अगेन)
 • जानवर जब आदमखोर बन जाए... तो उस की चमडी उधेड कर दीवार पर चिपका दी जाती है!  (चायना गेट)
 • मुझे कोई नही मार सकता... ना आगे से, ना पीछे से, ना दाए से.. ना आदमी, ना जानवर, ना अस्त्र, ना शस्त्र!  (नरसिंह)
 • मजहब इन्सानों के लिए बनता है... मजहब के लिए इन्सान नही बनते! (ओह माय गॉड) 
 • हर इन्सान को जिंदगी में एक बार प्यार जरूर करना चाहिए... प्यार इन्सान को बहुत अच्छा बना देता है!  (प्यार तो होना ही था)
 • मैं जब भी करता हूँ, इन्साफ ही करता हूँ!  (नरसिंह)
 • मैं ऐसे लोकतंत्र में विश्वास नही करता... जो गरिबों की इज्जत करना नही जानता!  (चक्रव्यूह)
 • जंग कोई भी हो, नतीजा कुछ भी हो... एक सिपाही अपना कुछ ना कुछ खो ही देता है!  (चायना गेट) 
 • जिस दिन पोलिस की वर्दी का साथ पकडा... उस दिन डर का साथ छोड दिया!  (अग्निपथ) 

अर्धसत्य, आक्रोश, मिर्चमसाला, जाने भी दो यारो, द्रोहकाल, धारावी, हेराफेरी, चाची-420, माचीस, मुंबई एक्सप्रेस अनेक चित्रपटांमधून त्यांनी अत्यंत वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. जितक्या प्रभावीपणे ते गंभीर भूमिका वठवत असत तितक्याच सहजपणे ते विनोदी भूमिकांतून प्रेक्षकांना हासवत असत. 

नवखा कलाकार वा चॉकलेट हीरो असो पुरी त्यांना सांभाळून घेत, तसेच आघाडीची हिरॉईन असो, अथवा सुपरस्टार अभिनेता असो त्यांच्यासोबत तितक्याच सहजपणे आपली वेगळी छाप पाडत 'स्क्रीन' व्यापून टाकणारा अभिनेता म्हणजे ओम पुरी. नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर, अंबरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर यांबरोबरच अनेक तुल्यबळ नटांसोबत ओम पुरींच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे ही रसिक प्रेक्षकांसाठी एक 'ट्रीट' ठरते. AK-47, गुप्त, आघात, नासूर, अर्धसत्य या चित्रपटांत त्यांनी सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत केलेल्या भूमिका उल्लेखनीय आहेत. त्याचप्रमाणे 'मालामाल वीकली' मधील धमाल विनोदी भूमिका त्यांनी किती सहज साकारलीय यातून त्यांचे अभिनय कौशल्य विशेष अधोरेखित होते. 'पत्थर'मधील अनुराधा पटेल आणि ओम यांची जोडी लक्षात राहिली. 'बहू की आवाज' चित्रपटामध्ये सुप्रिया पाठक यांच्यासोबतही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे भूमिका वठवली. 

इतर माहिती : 
जन्म 
18 ऑक्‍टोबर 1950, अंबाला, (हरियाना) 

बालपण 

 • पूर्वी पंजाबमध्ये आणि सध्या हरियानामध्ये असलेल्या अंबाला शहरातील एका पंजाबी कुटुंबात पुरी यांचा जन्म झाला. 
 • त्यांचे वडिल भारतीय रेल्वेत आणि भारतीय लष्करात कार्यरत होते. 
 • ओम पुरी यांचा जन्माविषयी नेमका पुरावा त्यांच्या पालकांकडे उपलब्ध नव्हता. आईने सांगितल्याप्रमाणे दसऱ्याच्या दोन दिवसानंतर त्यांचा जन्म झाल्याची नंतर नोंद करण्यात आली. 
 • ओम पुरी यांना शाळेत प्रवेश घालताना त्यांच्या काकांनी 9 मार्च 1950 अशी अधिकृत जन्मदिनांक नोंदविली. 
 • मात्र ओम पुरी यांनी सज्ञान झाल्यावर 1950 साली दसरा कधी साजरा होता, याबाबत माहिती घेऊन 18 ऑक्‍टोबर 1950 अशी जन्मतारीख केली. 

शिक्षण 

 • पुरी यांनी पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट येथून पदवी प्राप्त केली.
 • नसरुद्दीन शहा यांच्यासोबत त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे 1973 साली शिक्षण घेतले. 

इतर ब्लॉग्स