दिल्लीच्या राजकारण्यांना आंदोलकांची भीती का ?

ऋतुजा कदम
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

दिल्ली विधानसभेच्या प्रचारात भाजपने पुन्हा आक्रमक हिंदुत्वाचा आधार घेतला. शाहीन बागमध्ये सुरू असलेले नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातले आंदोलन भाजपच्या सर्व बड्या नेत्यांच्या निशाण्यावर असल्याचे दोन दिवसांतील घडामोडींवर स्पष्ट झाले आहे. दिल्लीमध्ये छेडल्या गेलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी रिठाला विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेत ‘गद्दारांना गोळी मारा’ या जमावाला भडकवणाऱ्या घोषणेचा आधार घेतला खरा पण, त्यानंतर दिल्लीमध्ये तीन युवकांनी भरदिवसा गोळ्या झाडल्या आहेत.

दिल्ली विधानसभेच्या प्रचारात भाजपने पुन्हा आक्रमक हिंदुत्वाचा आधार घेतला. शाहीन बागमध्ये सुरू असलेले नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातले आंदोलन भाजपच्या सर्व बड्या नेत्यांच्या निशाण्यावर असल्याचे दोन दिवसांतील घडामोडींवर स्पष्ट झाले आहे. दिल्लीमध्ये छेडल्या गेलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी रिठाला विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेत ‘गद्दारांना गोळी मारा’ या जमावाला भडकवणाऱ्या घोषणेचा आधार घेतला खरा पण, त्यानंतर दिल्लीमध्ये तीन युवकांनी भरदिवसा गोळ्या झाडल्या आहेत. हे सर्व रातोरात झालेलं नाही, नेते सत्तेत येण्याच्या लालचेपोटी लोकांना भडकवत आहेत आणि त्यामुळेच दिल्लीत अशी आग लागली आहे. पण, फक्त हे एकच कारण असू शकत नाही. थोडसं मागे जाऊन विचार केला तर लक्षात येईल गेल्या दिड महिन्यात झालेल्या काही घडामोडींचे हे पडसाद आहेत.

CAA आणि NRC या मुद्द्यांवरुन देशभरातून लोक रस्त्यावर आले. सोयिस्कर पवित्रा घेणाऱ्या सेलिब्रिटी मंडळींनीही या वादामध्ये उडी घेत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया नोंदविली. त्यावरुनही वादाला नवे तोंड फुटले. सेलिब्रिटींमध्येही दोन गट पडले. दिड महिन्यापूर्वी 15 डिसेंबरला जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापिठातील विद्याथ्यांनी आंदोलन छेडले. त्यानंतर दिल्लीसह इतर शहरांतूनही विद्यार्थी रस्तावर उतरले. पण, दोन दिवसांतच जामियाच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. जामिया मीलिया विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठात घूसून पोलिसांनी विद्यार्थांना मारहाण केली. हे कमी म्हणून आता सोशल मीडियावरुन असं पसरत होतं की अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दिल्लीत पोलिसांच्या वेशात उतरुन या विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत असं समोर आलं. दिल्लीला नक्की कशाची भिती वाटतेय अशा प्रश्न राहून राहून वाटतो. गेल्या महिन्यातील हा फ्लॅशबॅक सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या भयावह परिस्थितीला तिथुनच सुरुवात झाली आहे. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. 

CAA आणि NRC वरुन मुस्लिम बांधवांना वाटणारी भिती ही साहजिक आहे पण, या कायद्याची संपूर्ण माहिती दिली गेलेली नाही. मुळातच हा कायदा फक्त मुस्लिम समुदायाला लागू होत नसून तुम्ही हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन असाल आणि तुम्ही देशाचे नागरिक आहात हे सांगणारी कागदपत्रं जर तुमच्याकडे नसतील तर, तुम्हाला स्थलांतरीत म्हणून घोषित करण्यात येईल. पण, तरीही वारंवार हा वाद हिंदू आणि मुस्लिम गटातील असल्याचे भासवले जात आहे. कोण करत आहे हे ? तुमच्यापर्यंत माहिती अपुरी पोहोचवली जात आहे आणि जे देशात किंबहूना दिल्लीत चाललं आहे ते घडवलं जात आहे. 
दिल्लीच्या विधानसभा प्रचारादरम्यान सत्तेत असणाऱ्या आणि विरोधी पक्षांमध्ये लाजिरवाणं आणि खालच्या थराचं राजकारण सुरु आहे. एकमेकांवर केली जाणारी आरोपांची चिखलफेक आणि त्यातून सामान्य जनतेला धर्माच्या नावाखाली भडकवणे एवढचं काय ते सुरु आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर जाहीर सभेत ‘गद्दारांना गोळी मारा’अशी जमावाला भडकवणाऱ्या घोषणा केली. ठाकूर मंचावरून ‘देश के गद्दारोंको’ असा नारा देत होते आणि उपस्थित भाजप कार्यकर्ते ‘गोली मारो सालों को’, असे उत्तर देत होते. आपल्या आवाहनाला उपस्थितांनी अधिक जोरदार प्रतिसाद द्यावा यासाठी अनुराग ठाकूर यांनी मंचावर बसलेले आणखी एक केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात घोषणा द्या, असेही उपस्थित कार्यकर्त्यांना उद्युक्त करताना दिसत होते. आपण काय बोलतो आहोत याचं भान भाजप नेत्यांनी कधीच सोडलं आहे असं एकंदरीत वाटतं. 

याचे पडसाद थेट उमटले ते जामियाच्या कॉलेजात. विद्यापीठाच्या परिसरात वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर एका युवकाने आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. यात जामियातील एक विद्यार्थी शादाब फारुख हा काश्मीरी युवक जखमी झाला. गोळी झाडणारा गोपाळ‘ये लो आझादी’असं तो म्हणत होता. महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी देशात आणखी एका गोडसेचं दर्शन झालं. आंदोलन करणं हा गुन्हा नाही. शांतपणे गेले एक महिना विद्यार्थी आणि शाहिनबागमध्ये मुस्लिम महिला आंदोलन करत आहेत. पण, ते अशापद्धतीने रोखण्याचे अधिकार या युवकाला किंवा असा विचार करणाऱ्यांना कोणी दिले? रामभक्त स्वत:ला म्हणवून घेण्याऱ्या या युवकाला कलप्नाही नाही त्याने काय केलं आहे. पण, युवकांच्या, तरुण पिढीच्या आणि सामान्य जनतेच्या मनावर गेले कित्येक महिने हे बिंबवलं जात आहे की हिंदूत्व हेच सर्वस्व ! 

वणव्याला सुरुवात झालेय आणि ती पसरत जात आहे. या घटनेला एक दिवस होतोय तोपर्यंत आणखी एका व्यक्तीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शहरातील शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलकांवर दहशत दाखवण्याच्या उद्देशाने एका युवकाने हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्याने गोळ्या झाडताना ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या आणि या देशात कोणाचेही नाही पण केवळ हिंदुंचेच चालेल, अशा तो धमक्या देत होता. त्याच्याकडे सेमी ऑटोमेटिक पिस्तुल होती. 

Image may contain: 3 people

इथे अनेक प्रश्न उपस्थित होतात, मुळात या युवकांकडे पिस्तुल येतेच कशी ? अशाप्रकारची पावले उचलुन आपण काही चुकीचं करत नाही किंवा यातून आपली सुटका होईल हा चुकीचा विश्वास कोण देत आहे ? हे सर्व दिवसाढवळ्या आणि तेही पोलिसांच्या डोळ्यादेखत घडलं आहे. पोलिसांची बघ्याची भूमिका कायम होती. हाताची घडी घालून फक्त बघणे त्यांना बरोबर वाटले. हेच का ते दिल्लीचे पोलिस ज्यांनी जामियाच्या मुलांवर भयानक हल्ला झाला तेव्हा मारेकरऱ्यांना जाऊ दिले होते ? हेच का ते दिल्ली पोलिस ज्यांनी जामियाच्या मुलांवर हल्ला झाला तेव्हाही बघ्याची भूमिका घेतली. या सर्व प्रकारात पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. कोणत्या ‘दबावा’खाली काम करत आहेत हे स्पष्ट होत आहे. 

हे सर्व घडत असताना मात्र भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याने किंवा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुराग ठाकुर यांच्या भाषणावर आक्षेप घेतला नाही. ठाकुर यांनी केलेलं भाषणं कितपत योग्य होतं आणि भाषा चुकीची होती हे ते मान्य करायला तयार नाहीत. अनुराग ठाकुर यांनी खुलेआम दिलेल्या या भडकावू भाषणामुळे त्यांना भाजप निलंबित करण्याची तसदी घेईल का ? या सर्व प्रकारानंतर प्रसारमाध्यमांच्या डिबेटवर येणाऱ्या भाजप कार्यत्यांनी जे झालं त्यावर बोलणे टाळलं. आरोपीचं नाव गोपाल आणि कपिल नसतं आणि ‘इस्माइल’ असतं तर, आम आदमी पार्टीने बोलण्याचीही तसदी घेतली नसती अशाप्रकारची उत्तरे भाजप प्रवकत्यांकडून देण्यात आली. गोपाल आणि कपिल आम आदमी पक्षाचेच एजंट आहेत हे सांगण्याचा मुर्खपणाही भाजपचे प्रदेशअध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला. 
CSDS लोकनीती यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात म्हटलं आहे की, “दिल्लीच्या मतदार केंद्रात मोदींनी केलेल्या कामापेक्षा आपने (AAP) राजधानीत केलेल्या कामाच्या आधारे मतदान करण्याची शक्यता जास्त आहे.” यावर एक सर्वेक्षणही करण्यात आले ज्यात जवळपास ५५ टक्के लोकांनी आपच्या कामाकडे पाहूनच मतदान करु असं सांगितलं. मग, १५ टक्के लोकांनी मोदींनी केंद्रात केलेल्या कामाकडे पाहून मतदान करू असे सांगितले. त्यामुळे सर्वेच्या मते केजरीवाल विरुद्ध मोदी असा लढा झाल्यास केजरीवाल या शर्यतीत पुढे असल्याचं चित्र दिसत आहे.

अरविंद केजरीवाल यांना आतंकवादी म्हणवून स्वत:ची मतं वाढवण्याचा प्रयास प्रवेश वर्मा करत आहेत. गृहमंत्री अमित शहा करंट लावण्याची भाषा करतात तर, अनुराग ठाकुर गोळी मारण्याची घोषणा देत आहेत. दुसरीकडे युपीचे मुख्यमंत्री योगीअदित्यनाथ म्हणत आहेत, ‘बोली से नही माने तो, गोली से मानही जाएंगे’.दिल्लीची विधानसभा आपण हरणार आहोत याची भिती भाजपला वाटते आहे. 

देशाची तरुण पिढी कोणत्या दिशेला जात आहे याचं चित्र भयावह आहे. नेत्यांच्या ‘हेट स्पिच’ ने संपूर्ण देशाचा माहोल खराब केला आहे आणि कुठेतरी अशाप्रकारची गंभीर पावलं उचलणं चुकीचं नाही हे सामान्य लोकांच्या मनात पेरलं जात आहे. नेत्यांनी त्यांच्या भाषेकडे लक्ष देत गांर्भीयांने घेण्याची गरज आहे. रामभक्तांसारख्या युवकांना अशा प्रकारचं धाडस करण्याची हिम्मत देत आहे. रामभक्त गोपाल किंवा कपिल यांच्यासारख्या अनेकांना असेच वाटत आहे की गोळी चालवणे हा त्यांचा अधिकार आहे. आज दिल्ली पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असती तर, ती गोळी शादाबच्या हाताला लागली नसती. 

https://writerrutuja.wordpress.com/

इतर ब्लॉग्स