बदल घडवणारे सामूहिक नेतृत्व 

collective leadership
collective leadership

मुंबई इथे दि. २४ ते  २५ जानेवारी २०१७ या दोन दिवशी - नेहरू सेंटर मध्ये - डिलिव्हरिंग चेंज फोरम मध्ये सहभागी झालो. चीफ मिनिस्टर ट्रान्सफॉर्मेशन कौन्सिलचा निमंत्रित सदस्य या नात्याने या फोरम मध्ये सहभागी होता आले. सकाळ ग्रुपचे श्री. अभिजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारमंथनातून पुढे आलेली हि संकल्पना. 

चांगला बदल घडवायचा तर समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व विभागातील काम करणाऱ्या लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून आणि त्यांच्या विचारातून शक्य आहे. राजकारण विरहित आणि त्यापलीकडे जाऊन समग्र विचार करणारी एखादी संस्था हे कार्य चांगल्या पद्धतीने करू शकते. त्यामुळे सर्वानाच यात सहभागी करून घेता येते. 

जगभरातील अनेक विषयांमधील तज्ञ आणि संस्था, यांचे विचार आणि कार्य आणि संकल्पना या मध्ये पाहायला मिळाल्या. आपण विचार करतो ती पद्धत आणि इस्रायल, जर्मन या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमधील फरक लक्षात आला. आपण एखादा व्यवसाय सुचला कि त्याचा पूर्ण विचार न करता तो सुरु करतो... पण ते लोक त्याचा समग्र असा विचार करतात. त्यामुळे त्यांची यशस्विता वाढते. 

नवीन विचाराना आणि तरुणांना तो समाज विविध संस्थांच्या माध्यमातून मोठे पाठबळ देतो. त्यांना उभे राहण्यास मदत करतो. 

ज्यावेळी भारत हा समग्रतेचा विचार करत होता त्यावेळी आपल्याकडे सुवर्णयुग होते. भरभराट होती. तीच समग्र विकासाची संकल्पना म्हणजे आपल्या लाडक्या राजकारणी भाषेत सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची संकल्पना या चीफ मिनिस्टर ट्रान्सफॉर्मेशन कौन्सिल आणि  डिलिव्हरिंग चेंज फोरम यांच्या माध्यमातून साकारण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ कोणीतरी नेता येऊन, सरकारी यंत्रणेच्या साहाय्याने चांगला बदल घडवेल हे शक्य नाही... तर सरकारी यंत्रणा, सकारात्मक सत्ताधारी आणि समाज यांच्या एकत्रित आणि योजून केलेल्या प्रयत्नातून बदल घडू शकतो. 

नव्या बदलाला सामोरे जाण्यासाठी ग्रामीण - शहरी भाग, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांना तयार करणे. हा बदल पचविण्याची त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करणे. हा बदल घडवून आणण्यासाठी या मधूनच नेतृत्व तयार करणे. आणि नव्या कल्पना निर्माण करण्यासाठी समाजामध्ये नवनिर्मिती पोषक वातावरण तयार करणे. केवळ चर्चेच्या पातळीवर या सर्व गोष्टी न राहता निश्चित कालमर्यादेत यातून जमिनीवरचे परिणाम दिसावेत हि रचना तयार करणे. जगभरातील अशा होत असलेल्या प्रयत्नांना आत्मसात करणे. आपलेही नवे प्रयोग त्या सर्वाना सांगणे. अशा विविध पातळीवर हे काम सुरु आहे आणि सुरु राहील. 

केवळ माहिती आणि तंत्रज्ञान इथेच न थांबता त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करणे. कला, तंत्र आणि विज्ञान यांच्या सर्जनातून आपल्या रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवर उत्तर शोधणे. हे उत्तर शोधात असताना, प्रत्यक्ष त्या प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या घटकांना सहभागी करून घेऊन त्यावर शाश्वत उत्तरे शोधणे हे काम या सगळ्या प्रयत्नातून अपेक्षित आहे. 

खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्रामध्ये चांगला बदल होताना दिसतो आहे. कारण बदल आधी वैचारिक पातळीवर होत असतो आणि कालांतराने तो साकार होत असतो. कोणीतरी एक माणूस अनेकांच्या संदर्भातील निर्णय घेणे आणि समूहाने एकत्र येऊन पारदर्शी पद्धतीने उत्तर शोधणे हेच मुळात आपल्या समाजाच्या व्यक्तिपूजक मानसिकतेसाठी मोठा भूकंप आहे. सामूहिक नेतृत्वाचा हा उदय, निश्चितच चांगले परिणाम देणारा ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com