फ्रेम्समधून मिळवा फेम

eyegears
eyegears

"ओ चष्मिश' ही हाक आत उपहासात्मक राहिलेली नाही. एखाद्याला चष्मा असला तर पूर्वी शाळा-कॉलेजमधून अशाच हाका कानावर पडायच्या; पण आता चष्मा हे एक गरजेची ऍक्‍सेसरी झाली आहे. कॉलेजमधील तरुणांपासून ते प्रौढांपर्यंत सगळ्यांच्या फॅशनमध्ये रेट्रो स्टाइल, फंकी स्टाइल चष्म्याचा समावेश झाला आहे. बाजारात आलेल्या चष्म्याच्या नावीन्यपूर्ण फ्रेम्सच्या ट्रेंड्‌सविषयी जाणून घेऊ : 

- बॉलिवूडमधील गायक, अभिनेते, अभिनेत्री या सर्वांच्या फॅशनमध्ये चष्मा हायलाइट होत आहे. बॉलिवूड फॉलोअर्स असलेल्या अनेक तरुणांच्या डोळ्यावरही विदआउट नंबरचे चष्मे दिसतात. थोडक्‍यात चष्मा हा एक स्टाइल आयकॉन झाला आहे. 

- चष्म्याच्या तंत्रज्ञानाबरोबर डिझाइन्समध्येही बदल झाला आहे. काही जुनी डिझाइन्स परत आली असून, त्याला थोडा ऍडव्हान्स टच म्हणून ते कलरफुल केले आहेत. यामुळे प्रत्येक मुलाकडे त्याच्या पेहरावाला साजेशा अशा किमान दोन-तीन फ्रेम्स असतात, शिवाय सनग्लासेस वेगळेच. 

- हल्ली लॅपटॉप, संगणक, टीव्ही, स्मार्टफोन यामुळे डोळ्यांवर येणारा ताणही तुलनेने जास्त असतो. यासाठी अँटिग्लेअर चष्मा करून घेण्याकडे तरुणांचा कल असतो. ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक नामांकित ब्रॅंडनी फ्रेम्स आणि त्यातील ग्लास या जास्तीत जास्त लाइटवेट करण्यावर भर दिला आहे. 
- चष्मा निवडताना आपली चेहरा, केसांची रचना, वापर यांचा प्राधान्याने विचार करावा. तरुणाई धातूच्या फ्रेम्सऐवजी प्लॅस्टिकच्या फ्रेम्सला पसंती देते. यामागचे कारण म्हणजे अर्थातच लाइटवेट फ्रेम्स कधी कम्फर्ट देतात. 

- मुलींसाठी रिमलेस फ्रेम्स, कॅटआय स्टाइलच्या फ्रेम्सची क्रेझ दिसते. एव्हिएटर स्टाइलच्या फ्रेम्सना मुलांकडून पसंती मिळते. 

- विवाहसमारंभापासून ते विकेंड पार्टीपर्यंत या फ्रेम्स तुम्ही सहज वापरू शकता. ट्रिपला जाताना फंकी लूकच्या फ्रेम्सही खास दिसतात. सध्या फ्रेम्समध्ये ब्लॅक, मरून, तपकिरी, गोल्डन, रेड, व्हाइट, लाइट ब्ल्यू अशा रंगांना प्रचंड मागणी केली जाते. सिंगल कलरपासून ते डबल मिक्‍स कलरच्या फ्रेम्सची स्टाइलही एकदम फॉर्मात आहे. 

- बऱ्याच मुलींना सगळ्या ऍक्‍सेसरीज मॅचिंग लागतात, अशांसाठी फ्रेमकाड्या बदलता येणाऱ्या चष्म्यांचाही पर्याय उपलब्ध आहे. या सर्व फ्रेम्स नॉन ब्रॅंड कमीत कमी 100 - 150 रुपयांपासून आठ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com