प्रवासातील काळजी 

travel accessories
travel accessories

रोजच्या दगदगीमधून वेळ काढून आपल्या जीवलगांसोबत भटकंती करणे सर्वांनाच आवडते. अशी भटकंतीमुळे आपले मन तर ताजेतवाने होतेच पण त्यासोबतच आपण जेव्हा आपल्या रोजच्या आयुष्यात परततो तेव्हा एक प्रकारची सकारातत्मकता देखील मिळते. प्रवास करताना खाण्यापिण्याचे पथ्यपाणी सांभाळले आणि काही काळजी घेतली तर हा प्रवास नक्कीच सुखकर ठरतो आणि आनंद द्विगुणित होतो. प्रवासाला जाताना काय काळजी घ्यावी याच्या काही टीप्स 

  • हवामानातील उष्णतेमुळे होणारा डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी प्रवासाला जाताना सोबत ग्लुकोज पावडर किंवा इलेक्‍ट्रोलाईट पावडरचे सॅशे सोबत बाळगावे. 
  • स्वतःचे ओळख पटवता येईल असे सरकारी कागदपत्रांची झेरॉक्‍स प्रत प्रवासात कायम सोबत असावी. अडीअडचणीच्या प्रसंगी त्यांचा हमखास उपयोग होतो. 
  • आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल फोन पूर्ण चार्ज करुनच प्रवासाला बाहेर पडावे. आजकाल पोर्टेबल पॉवर बॅंक बाजारात मिळतात. शक्‍य असल्यास त्यादेखील सोबत बाळगाव्यात. 
  • नोटाबंदीनंतर झालेल्या चलनतुडवडा लक्ष्यात घेता आपण जेथे फिरायला जाणार तेथे ऑनलाइन पेंमेंटची सुविधा आहे की नाही याची चौकशी करून घ्यावी. त्यानुसार पुरेशी रोकड सोबत ठेवावी. एटीएम, ऑनलाइन पेमेंट या सुविधांवर पूर्णतः अवलंबून राहू नये. 
  • आपण जिथे जाणार आहोत तिथल्या आजूबाजूच्या परिसराची माहिती असू द्यावी. ठिकाणांची नावे, प्रवासाचे अंतर यांची सर्व माहिती घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. त्याचा एखादा छोटा नकाशा सोबत असू द्यावा. 
  • स्वतःसोबत पुरेसे सुट्टे पैसे असू द्यावेत. रेल्वेत, बसमध्ये, दुर्गम खेडोपाड्यात दर वेळेला तुम्हाला सुट्टे पैसे मिळतीलच याची खात्री नसते. 
  • ओळखपत्रे, रोकड, टॉर्च, छोटी पाणी बॉटल, कॅमेरा,मोबाईल, तिकिटे हे सर्व महत्त्वाचे सामान एकत्र ठेवता येईल अशी एखादी छोटी सॅक किंवा साइड बॅग कायम जवळ बाळगावे. 
  • स्वतःच्या वाहनाने प्रवास करणार असाल तर वाहन प्रवासाला जाण्याआधी दोन दिवस सर्व्हिसिंग वगैरे करून घ्यावे. गाडीत पेट्रोल, हवा व्यवस्थित भरली आहे याची खातरजमा करून घ्यावी. 
  • रोड ट्रीप सारख्या सहलींना जाताना एखादी 20 फुटी रोप कायम जवळ बाळगावा. बाईकच्या किंवा कारच्या कॅरिअर सामान बांधायला हा रोप हमखास कामी येतो. 
  • प्रवासाला जाताना विशेषतः उन्हाळ्यात पांढऱ्या किंवा सौम्य रंगाचे कपडे परिधान करावे ज्यामुळे कमी उष्णता शोषली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचा एखादा पंचा किंवा रुमाल तोंडाला आणि मानेभोवती गुंडाळावा. तसेच गॉगलचा वापर करावा. यामुळे उन्हाचा तडाखा कमी बसतो. 
  • प्रवास म्हटले की बाहेरचे खाणे अपरिहार्य असते तरीही प्रवासात असताना शक्‍यतो डबाबंद पदार्थ, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत. शक्‍यतो ताजे व गरम अन्न खावे. 
  • प्रवासात थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहावे. स्वतःच्या वाहनाने प्रवास करत असाल तर पाण्याचा पुरेसा साठा सोबत बाळगावा. 
  • प्रवासात लहान मुले असतील तर त्यांचे सामानाची वेगळी पिशवी करावी, ज्यादाचा कपड्‌यांचा जोड, डायपर सोबत ठेवावे. दुधापेक्षा दूध पावडर सोबत ठेवावी.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com