esakal | पाकिस्तानच्या सिंधूची इटलीतून ई-सकाळला विशेष मुलाखत; काय सांगते सिंधू?
sakal

बोलून बातमी शोधा

pakistani-girl

मी स्वत:लाच घरामध्येच आयसोलेट केलेय. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या हे खूप आव्हानात्मक आहे. काही दिवसांपूर्वी मलाही ताप आणि सर्दी झाली होती. त्यावेळी अचानक भिती निर्माण झाली.

पाकिस्तानच्या सिंधूची इटलीतून ई-सकाळला विशेष मुलाखत; काय सांगते सिंधू?

sakal_logo
By
ऋतुजा कदम

मी मुळची पाकिस्तानची पण, इटलीमध्ये येऊन सहा महिने झाले. इथे मी इंटिरियर डिझायनिंगमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत आहे. जानेवारीत कोरोनाबद्दल काहीतरी ऐकल्याचे मलाआठवते. पण, कोणालाही याबद्दल खात्री नव्हती. इतर सामान्य फ्लूसारखेच काही तरी असा समज झाला म्हणून फार गांभीर्याने घेतले नाही. फेब्रावारीच्या दुसर्याे किंवा तिसर्याअ आठवड्यात कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर कुठेतरी भीतीचे वातावरण पसरु लागले.माझे काही मित्र आणि अगदी रूममेटसुद्धा त्यांच्या मायदेशी  निघून गेले. त्या वातावरणात मी अगदीच गोंधळून गेले आणि काही सुचत नसल्याने थांबण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काही दिवसांतच मला समजले की शाळा, दुकाने आणि सर्व काही बंद आहे. मला इटलीमध्येच राहण्याशिवाय पर्याय उरला नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक चिनी जोडपं सुट्टीसाठी रोममध्ये आले होते आणि हेच पहिले कोरोनाबाधित असल्याचे समजले. मात्र हे लक्षात येईपर्यंत शहरात आधीच कोरोना पसरलेला होता. मिलान आणि उत्तर इटलीच्या आसपासच्या सुप्रसिद्ध शहरात संसर्ग झपाट्याने पसरत होता. देशाला खरंतर हे सर्व पचवायला आणि त्यातून सावरायला वेळ मिळाला नाही. अशा परिस्थितीतही, लोकांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मास्क वापरण्याचीहीकोणालाकाळजी नव्हती.

सर्वात आधी जेव्हा मिलानमध्ये कोरोनाची घटना समोर आली. तेव्हा शहर पूर्णपणे बंद करण्यात आले होते. अपुऱ्या माहितीमुळेआणि भीतीपोटी लोक शहरे बदलू लागले. काही आठवड्यांपूर्वी उत्तरेकडील शाळा प्रथम बंद झाल्यावर बर्यानच जणांनी ‘सेल्फ आयसोलेशन’ चे उपाय फार गांभीर्याने घेतले नाहीत. ते आपल्या मुलांना घेऊन डोंगरावर आणि इतर प्रदेशात समुद्रकिनारा असलेल्या ठिकाणी गेले. अर्थात त्यामागे ते मुलांना सुरक्षित ठेवत आहेत असा विचार करत होते. एका शहरातून दुसरीकडे जाण्याची लोकांची संख्या सर्वाधिक होती. भीतीपोटी त्यांनी शहरे बदलली आणि याच कारणाने कोरोना पसरण्यासाठी अधिक वाव मिळाला. 

मिलानमधील आरोग्यव्यवस्था ही सर्वात चांगली असल्याचे मानले जाते. वाढत्या आकड्यांमुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते. व्यवस्था तोकड्या पडू लागल्या आहेत.इटलीतील लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यास मदत करण्यासाठी सैनिक तयार केले जात आहेत.रूममेट गेल्यापासून मला एक वेगळी भीती जाणवते. आज नाहीतर उद्या हा कोरोना आपल्यावरही हल्ला करेल अशी भिती मनात आहे. देशात तो अजुनही झपाट्याने पसरतोय.त्यामुळे मी स्वत:लाच घरामध्येच आयसोलेट केलेय. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या हे खूप आव्हानात्मक आहे. काही दिवसांपूर्वी मलाही ताप आणि सर्दी झाली होती. त्यावेळी अचानक भिती निर्माण झाली. सर्वकाही संपणार आहे असे वाटू लागले. पण, त्यातून मी बरे झाले. स्वत:ला सावरण्याचे काम मी करतेय आणि आवश्यक ती सर्व काळजी घेतेय.

(सिंधू झैब मुळची पाकिस्तानची असून इटलीमध्ये शिक्षण घेते आहे.)

शब्दांकन : ऋतुजा कदम