मानससूत्र - ‘ड्रेसिंग’ची ‘पॉवर’

पॉवर ड्रेसिंग....आपल्या मायबोलीतच बोलायचे झाले, तर जाल तिथे सत्ता गाजवू शकेल असा पेहराव! पॉवर ड्रेसिंग खूप पूर्वापार चालत आलेले आहे.
Dressing
Dressing sakal

डाॅ. जयश्री फडणवीस

पॉवर ड्रेसिंग....आपल्या मायबोलीतच बोलायचे झाले, तर जाल तिथे सत्ता गाजवू शकेल असा पेहराव! पॉवर ड्रेसिंग खूप पूर्वापार चालत आलेले आहे. आपण इतिहासात डोकावले, तर सूटबूट घातलेल्या पुरुषांच्या बरोबरीने आठवतात त्या पॉवर वुमेन. राणी व्हिक्टोरिया, मार्गारेट थॅचर आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी- ज्या कायम आपल्याला पॉवर साडीमध्येच दिसायच्या.

सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायला हवे, की प्रसंगानुरूप वेशभूषा करणे हे कायमच आपल्याला उपयोगी पडते. सर्वांत आवश्यक ठरते ते नोकरीच्या मुलाखतीला जाताना. आपण योग्य नीटनेटका पेहराव करून मुलाखतीला जातो,

तेव्हा स्वतःबरोबरच त्या मुलाखतीचा व कंपनीचाही सन्मान करतो. आपण त्यासाठी दिलेला वेळ आणि महत्त्व हे मुलाखतकारांच्या निदर्शनास येत असते. भारतीय कंपन्यांमध्ये, पॉवर ड्रेसिंगला खूप महत्त्व आहे. पॉवर ड्रेसिंगमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव येतो. तुमच्यातील प्रोफेशनॅलिझम आणि त्या कंपनीविषयीचा आदर दिसून येतो.

मुलाखतीसाठी फॉर्मल पद्धतीचा पेहराव आवश्यक असतो. फॉर्मल शर्ट, ट्राऊझर्स आणि टाय पुरुषांसाठी, तर स्कर्ट, बंद गळ्याचा सलवार सूट अथवा साडी स्त्रियांसाठी. मुलींनी काहीतरी खूप साधेसेच अथवा कोठेही अंगप्रदर्शन करणारे उदाहरणार्थ स्लीव्हलेस या प्रकारचे कपडे घालणे टाळावे.

ज्यामुळे आपण अनप्रोफेशनल अथवा मुलाखतीस मान न देणाऱ्यांमधील वाटू. त्यानंतर खूप भडक मेकअप अथवा कपडे घालणे, त्यावर भरमसाठ दागदागिने घालणे अगदीच टाळावे. या सर्वांमागचे मानसशास्त्रीय कारण म्हणजे तुमच्याकडे नोकरीसाठीचा उमेदवार म्हणून बघणे कठीण होईल. इतर गोष्टींवरच मुलाखतकाराचे लक्ष केंद्रित होईल. आपले कपडे नीट इस्त्री केलेले असावेत. स्वच्छ असावेत.

Hygiene म्हणजे शारीरिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. तुम्हीच विचार करा. तुमच्याशी बोलताना समोरच्याच्या तोंडाला कांदा-लसणाची अथवा इतरही कोणती दुर्गंधी येत असेल, तर तुम्हाला बोलावेसे वाटेल का? तर माऊथ वॉश वापरायला हवा. दुरून प्रवास करून पोचणार असाल, तर वेट वाइप्स बरोबर ठेवा. चेहरा पुसून, नीट फ्रेश होऊन मुलाखतीला जा. अरे हो! आणखीन एक गोष्ट, Perfume सांभाळून वापरा. खूप उग्र नको. पुरुषांसाठीचे आणि महिलांसाठीचे परफ्युम्स समजून घ्या. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे परफ्युम पण वापरता आले पाहिजेत.

हातांकडे, नखांकडे लक्ष द्या. मुलांनी नीट स्वच्छ, कापलेली नखे अपेक्षित आहेत, तर मुलींनी खूप भडक नेल पेंट्स मुलाखतीला टाळावीत. पूर्वी असे म्हणत, की गुळगुळीत दाढी करून मुलाखतीला जा; पण आता ट्रेंड बदलला आहे. स्वच्छ मोजे घालणे अतिशय आवश्यक. मुलाखतीची वाट बघत असताना जर कंटाळून चुकून आपण बूट काढले आणि जर एसी रूममध्ये धुतलेले मोजे नसतील, तर काय होईल?

अजून एक गोष्ट जी आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे ज्या कंपनीत मुलाखतीस जात आहोत, तिथे काय कल्चर आणि व्हॅल्यूज सांभाळल्या जातात ते. मॉडर्न आयटी कंपनी असेल तर गोष्ट वेगळी. शेवटी आपण कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे, त्याहीनुसार वेशभूषा केली पाहिजे.

पॉवर ड्रेसिंग हे आपले फर्स्ट इंप्रेशन पडण्याकरीता अतिशय महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या, की इंटरव्ह्यू बोर्डसुद्धा कंटाळलेले असते. त्यातच जर एखादा उमेदवार काही वेगळेच परिधान करून गेला,

तर मुलाखत राहते बाजूला आणि करमणूकच सुरू होते. आणि म्हणून आपण जर पॉवर ड्रेस्ड असलो, तर आपल्या व्यक्तिमत्वाची जोड ज्ञानाला मिळेल.एकंदर काय, तर आपल्या मुलाखतीला सुरवातीपासूनच उत्तम वळण मिळेल याची काळजी आपण पॉवर ड्रेसिंगद्वारे घेतली पाहिजे. खरे म्हणजे कोठेही जाताना जे काही घालाल, ते प्रसंगानुरूप, उत्तम hygiene सांभाळून घाला. Yow will always appear as a powerfull personality in a powerfull attire.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com