‘आओ चिनीयो मैदान मे देखो हिन्द का हाथ!’

Sant Tukdoji Maharaj.jpg
Sant Tukdoji Maharaj.jpg

तुकडोजींचा जन्म तसा अमरावती जिल्ह्यातील यावली (शहीद) या छोट्याशा गावामधला 1909 मध्ये, 30 एप्रिल ही त्यांची जन्मतारीख. अगदीच बालवयातच गोदोडो, नेरी, रामटेक, दिघी या घनदाट हिस्त्रपशुंच्या जंगलामध्ये भ्रमंती करायचे. 12 वर्षांच्या तपानंतर कळले की, हा बालमाणिक साधारण पोर नसून, कोणीतरी मोठा तपस्वी घडणारा आहे आणि तशी माहिती पुढे येत होती. 1936 मध्ये कोणी तरी महात्मा गांधी सेवाग्रामला असताना गांधींनी त्यांना घेऊन येण्याचे सांगितले. चंद्रपूर भागातून तुकडोजी महाराजांना दोन सेवक घेऊन आले. तेव्हा महात्मा गांधीजीचे मौणव्रत सुरू होते. अनेक लोक भेटी-गाठी घेऊन गांधीजींना लेखणीद्वारे पाटीवरच लिहून चर्चा करायचे. परंतु तुकडोजी महाराजांकडे पाहून नजर एक करून गांधीजींनी थांबण्याचा इशारा केला व तुकडोजी सेवाग्रामला तब्बल एक महिनाभर थांबले. गांधीजींना एक वेळ भजन ऐकण्याची ईच्छा झाली आणि तुकडोजींनी भजन गायला सुरुवात केली. ‘किस्मत से राम मिला जिनको। उसने यह तीन जगह पायी’ हे भजन म्हणताच, गांधीजींनी पूर्ण तल्लीनतेने ऐकून ‘वाह क्या बात है’ असे उद्‌गार काढून एका अर्थाने त्यांचे मौण तुटले होते, ऐवढी ताकद त्यांच्या शब्दात होती.
यापूर्वी राष्ट्रसंताचे कार्य हे राष्ट्रीय स्वरुपात सुरू झालेले होते. 1942 च्या भारत छोडो आंदोलनामध्ये हजारो युवकांनी त्यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. गुरुकुंज, नागठाणा अशा ठिकाणाहून जनजागृती करून चिमूर, आष्टी, यावली, याठिकाणी इंग्रजांच्या गोळीबारामध्ये अनेक गुरुदेव भक्त शहीद झाले. ‘झाडझडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे’ असे जोशपूर्ण भजन भाषणाने पूर्ण पूर्व विदर्भ त्यावेळचा नागपूर प्रांत दणाणून सोडला व त्यानंतर त्यांना जमावबंदी विरोधात नागपूर व रायपूरला तुरुंगवास झाला. चार महिन्यांनी तुरुंगातून आल्यानंतर अनेक ठिकाणी प्रचारार्थ भजन, भाषण, सामुदायिक प्रार्थना सुरुच होत्या. त्याच्या राष्ट्रीय सामाजिक लढ्याची नोंद नसणे ही शासनदरबारी शोकांतीकाच आहे.
त्यांच्या कार्याचा स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा आहे. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. राष्ट्रसंताना आता स्वशासनाचे सुशासन करण्याची जबाबदारी होती. त्यांनी गावेच्या गावे आदर्श करण्याचा संकल्प घेतला व काम सुरू झाले. 1932 मध्ये स्वतंत्र भारता विरोधात चीन देशाने आक्रमण सुरू केले. तेव्हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना चिनच्या उत्तरीय सिमेवर पाचारण केले. कारण भारतीय सैनिकांची मानसिक तयारी नव्हती व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तुकडोजी महाराजच हे काम करू शकतात, अशी शाश्‍वती राजेंद्र बाबूंनी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिली. परंतु पंडित नेहरुजींचा विश्‍वास बसत नव्हता. त्यांनी उपरांत मोठ्या जिद्दीने राजेंद्र बाबूंनी महाराष्ट्राच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना वसंतराव नाईक व यशवंतराव चव्हाण यांना जबाबदारी देवून राष्ट्रसंतांना पाचारण केले. भारतीय उत्तरीय सिमा सिलीगुड्डी, दार्जीलिंग या सिमेवर राष्ट्रसंतांनी साडेचार लाख सैनिकांसमोर त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता भाषण व भजन गायले आणि त्यांच्यात स्फूर्ती आणली. त्यांनी चीन सैनिकांना या भजनातून ठणकावले.
अरे तय्यार हुवा तय्यार हुवा । हिन्द तुम्हारे साथ ।
आओ चिनीयो मैदान में, देखो हिन्द का हाथ ।
धोके की राहमे क्या चलते है । जब शूर के संग लढना है ?
बचके न जाओंगे अबके । बस मारग मे तडपना है।
मारे मराने से कौन बचे। इतिहास सुनाने बात?
आओ चिनियों मैदाने मे देखो हिन्द का हाथ ।
आझादी है दिलसे प्यारी । बरबादी हम नही चाहते है ।
कट जाये मर जायेंगे हम । हटकर नही पिछे आते है ।
तुकड्यादास कहे इसरणमे। विजय हमारे साथ ।
आओ चिनियो देखो, हिन्द का साथ ।
अशाप्रकारे खंजेरी वाजवून भारतीय सिमा दणाणून सोडली. त्यानंतर एकही सैनिक सिमेवरुन सेना सोडून घरी परतला नाही. ही ताकद त्यांच्या शब्दात होती. म्हणून त्यांना राष्ट्रपती भवनमध्ये सन्मानाने ‘राष्ट्रसंत’ ही पदवी बहाल करण्यात आली. भारताचे राष्ट्रपती, पं. नेहरु, सर्वपल्ली राधाकृष्णन, श्रीमती इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री इत्यादी सर्वजण गुरुकुंज मोझरी येथे येवून सर्वधर्म प्रार्थना मानवता मंदिरमध्ये एक नाही तर दोन-दोन वेळा येवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याला नमन करून गेले. नंतर 1965 भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी सुद्धा लडाख सिमेवर राष्ट्रसंतांनी भेट दिली, असे अनेक देशांचे सुद्धा निमंत्रण त्यांना येत होते. त्यांनी सांगितलेले विचार आजही भविष्यवाणी ठरतात, त्यांची 111 व्या जयंती अर्थात ग्रामजयंती प्रित्यर्थ हा लेख समर्पित, जयगुरू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com