निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी ७ लाख रुपयांचे मानधन दिले धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी

निवृत्त कर्नल सुरेश पाटील : खासगी वाहिनीवरील मुलाखतीसाठी मिळाली रक्कम
Indian army Retired Colonel Suresh Patil gave seven lakh donation for  Revival of Dam in Wardha
Indian army Retired Colonel Suresh Patil gave seven lakh donation for Revival of Dam in Wardha sakal

उंड्री : सैन्यामध्ये देश रक्षणासाठी रात्रंदिवस काम केले. त्यानंतर समाजाच्या हित जोपासण्यासाठी निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांची खासगी वाहिनीवर पर्यावरण संवर्धन याविषयावर मुलाखत झाली. त्याचे मानधन म्हणून सात लाख रुपये दिल्यानंतर त्यांनी लगेच ती रक्कम वर्धा येथील धरणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी वापरणार असल्याचे सांगितले.निवृत्त सैनिकांनी स्थापन केलेल्या ग्रीन थंब एन्व्हार्यन्मेंट प्रोटेक्शन ग्रुप पुणेचे संस्थापक अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांची मुंबईमध्ये खासगी वाहिनीवर पर्यावरण संवर्धन या विषयावर मुलाखत रेकॉर्ड करण्यात आली.

कर्नल पाटील म्हणाले की, मागिल दीड महिन्यापासून विदर्भातील धरणातील गाळ काढण्याचे काम करीत आहेत. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे, त्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. मात्र, पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी धरणातील गाळ काढून पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यातील नव्हे, देशभरातील सर्वच धरणामधील गाळ काढणे काळाची गरज आहे. धरणातील गाळ शेतीसाठी वापरून शेतीसुद्धा सुपिक बनविता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com