आता वास्तवाचे 'भान' " ठेवायला हवे!

Jagdish Patil write Blog About about unemployed and Unsuccessful youth and their mentality
Jagdish Patil write Blog About about unemployed and Unsuccessful youth and their mentality

एखाद्या अनोळखी शहरात आपण जेव्हा पहिल्यांदा जातो त्या वेळी आपला अनुभव हा जितका नवा, तितकाच वेदनादायी असतो. कुठेतरी कामानिमित्त आपण आपलं गाव सोडून मनात खुप आशा अपेक्षा ठेवून शहरांमध्ये जात असतो, काहीतरी काम मिळावं आणि आपण सेटल व्हावं एवढीच काय ती इच्छा असते. पण ही एवढीशी इच्छा पुर्ण करायला आपल्याला कोणकोणत्या दीव्यांना पार करावं लागत ते हळूहळू कळतं.

आजकाल बरीचशी मुले इंजिनिअरींग, बी. कॉम, बी. ए. बीएस सी, आयटीआय करुन पुण्याला येतात, काही अन्य शहरांमध्ये जातात. कोरोनाच्या काळात ज्यांचे जॉब गेले ते आणि ज्यांनी कोरोनाच्या भितीने जॉब सोडलेले ते सर्व आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आपल्या कर्मभूमीकडे म्हणजेच पुण्याकडे येत आहेत. आपण जॉब करुन पैसे कमण्याचं स्वप्न बाळगत असतो तसेच काही “तुम्हाला जॉब लावतो“ असं सांगून त्यांचा जॉब करत असतात. त्यांना कॉन्ट्रॅक्टर हा गोंडस शब्द वापरतात. कोणी नवनवीन क्लास काढून ''तुम्ही ऍडमिशन घ्या, हमखास नोकरी लावून देतो'' असे सांगतात.  गावाकडून पहिल्यांदाच आलेली काही मुलं रोज एका नव्या क्लासच्या ऍडला आणि कॉन्ट्रॅक्टरला बळी पडतात. आधीच एवढा खर्च केलाय आता अजून शेवटचा प्रयत्न करु म्हणून मुले रोज नव्या आशेवर आणि जून्याच आपेक्षेवर ही पोरं पुण्या-बंगळुरच्या रस्त्यांवरती फिरत असतात. आधी काँलेजमध्ये असताना भोगलेली सुखे आठवल्यावर बिचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. “कोण कमी पडलं ? शिकवणारे की शिकणारे”! हा मनातला प्रश्न ते कोणालाच न विचारता मनात दाबून ठेवतात. मुळात आपल्यावर ही फिरायची वेळच का आली? आपण काय करायला पाहीजे या वास्तवाचं भान अजून तरी मुलांना आलंय का ? हा खरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे पण यावर ते विचार का करत नाहीत.

चुकीचा सल्ला घेऊन रोज कोणतातरी क्लास जॉईन करताना, मनात साशंकता कधीच कॉलेज मन लावून न करणारे, क्लास मात्र जीव लावून करतात. क्लास करुन आता काहींना 2-3 वर्ष झाली आहेत. मग त्यांना अजूनपर्यंत यश का नाही मिळालं ? याच्या बुडाशी काय आहे. आपला आळस की ते आपल्या बुध्दीमत्तेच्या पलीकडचे आहे. कारण कोरोनाच असेल तर ठीक पण कोरोनाच्या अगोदरपासून आपण जर प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नांना फळ मिळायला पाहिजे होते. जर ते मिळालं नसेल तर मात्र का यश मिळालं नाही या गोष्टींचा विचार आता करायला हवा, कि तो आपला पिंडच नाही हे निदान 4 वर्ष डिग्रीची आणि दोन वर्ष क्लासची गेल्यावर तरी कळायला हवं. त्यात घरची परीस्थीती चांगली असेल तर ठीक नाहीतर त्या बिचाऱ्या आईवडीलांना तरी का खोटी आशा लावावी? सांगावं सरळ जमत नाही मला, जमणार नाही मला, जमायचं असतं तर आता पर्यत ते जमणं राहील नसतं. पण, कुठेतरी युट्युबवर मोटीवेशनल व्हिडीओज बघून मनाचं समाधान करणे म्हणजे सक्सेस नव्हे. 

सक्सेस म्हणजे स्वत:ला ओळखनं, स्वत:च्या मर्यादा, स्वत:च्या सीमा, ज्याला माहीत असतात तो होतो यशस्वी ! तुम्हाला तुम्ही काय करु शकता हेच जर माहीती नाही तर तुम्ही का ते करावं ? दुसऱ्यांकडे बघून तसं व्हावं वाटणं गैर नाही पण ते वाटणं उथळ नसावं. कारण स्कँम सारखी वेबसीरीज बघून कोणी शेअरमार्केटमधला एक्सपर्ट होत नाही, पण व्हायची इच्छा सगळ्यांचीच असते असले हंगामी ध्येय ठेवणारे मग मध्येच अडकून बसतात आपण फक्त कोणाची तरी ‘यशस्वी’ कथा ऐकत असतो पण त्या मागचे ‘कष्ट’ बघण्याचे अणि तसे करण्याचे कष्ट आपण मनावर घेत नाही. यश हे बोलकं असतं यशाला खूप मित्र असतात पण अपयशाला नसतात; म्हणून आपणाला यशस्वी लोकांची एकच बाजूच माहिती असते. ‘केल्याने सगळ होतं, अशक्य असं काहीच नाही,’ हे असले डायलॉग नवे असाल तर ठीक आहे पण आधीच 2-4 वर्ष डिग्रीनंतर घालवूही तुम्हाला आता जे करतोय तो आपला पिंड नाही असे वाटत नसेल, तर मात्र अवघड आहे.

आपल क्षेत्र कोणतं हे ज्याला समजलं आहे तो काहीही करु शकतो. कोणी चहा विकून पुढे जातो. कोणी शेती करुन, कोणी आयटीमध्ये लाखोंनी कमावतो. कोणी स्पर्धा परिक्षा देऊन, पोस्ट काढून साहेब बनतो. या सर्वांमध्ये आपण कुठे आहे ??? हे ओळखायला हवं आणि आपण फक्त रिकामटेकडेच बसलोय का अभ्यासाच्या नावाखाली रोजचा दिवस सारखाच घालवतोय का?? याचा विचार करायला हवा. क्लास लावूनही प्लेसमेंट होत नाही. म्हणजे तुम्ही मठ्ठ आहात हे काणीतरी सांगण्यापेक्षा स्वत:ने ओळखलेलेच बरे आणि सरते शेवटी एकच सांगेन “ध्येय निश्चित असेल तर माणूस 100 चुका करतो मात्र ध्येय निश्चित नसेल तर 1000 चुका करुनही आपण चुकतोय हेच लक्षात येत नाही”. म्हणून आधी ठरवा प्रयत्न करा. यश नक्की मिळेल पण ‘स्वंयप्रेरीत’ होत असाल तर. कोणाच तरी एकून प्रेरीत झालेली ती बेगडी प्रेरणा खूप वेळ टिकू शकत नाहीत “वाघाचे कातडे पांघरलेला गाढव कधीतरी सापडतोच” तसं आपल होऊ नये एवढंच !

शेवटी, “क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे”...चला तर मग वास्तव जाणून घेऊया, स्वत:ला ओळखूया आणि ओळख सिध्द करुया !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com