Blog: सेतुबंधासन;हे आसन रोज केल्यामुळे अनेक आजार दूर होतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yoga,Lung increases respiratory problems children asthma

Blog: सेतुबंधासन;हे आसन रोज केल्यामुळे अनेक आजार दूर होतात

सेतुबंधासन हे लाभदायी आसन आहे. लहान मुले-मुली, महिला-पुरुष सर्वांसाठीच उपयुक्त आहे. सेतू म्हणजे पूल. या आसनस्थितीमध्ये शरीराची स्थिती पुलाप्रमाणे दिसते, म्हणून यास सेतुबंधासन म्हटले जाते.

असे करावे आसन...

हे शयनस्थितीमधील आसन असल्याने प्रथम पाठीवर झोपावे.

दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पायाचे तळवे जमिनीवरच ठेवावे. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडावे.

हळू हळू कंबर व पाठ जमिनीपासून वर उचलावे. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा.

आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये डोक्याची मागची बाजू, खांदे, दोन्ही हात, तळपाय जमिनीवर टेकलेले असावेत. श्वसन संथ सुरू असावे,

गळ्यावर दाब येणे अपेक्षित आहे. छाती, पोट व मांडी यावर ताण येतो. पाठ-कंबर यावर दाब येतो.

उलटक्रमाने सावकाश आसन सोडावे.

फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, श्वसनाचे त्रास कमी होतात, बालदमा, अस्थमा या त्रासांवर उपयुक्त.

पचनसंस्था, उर्त्सजनसंस्था, श्वसनसंस्था यांचे कार्य सुधारते.

पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. तो अधिक सुदृढ होण्यास मदत होते.

थायरॉइडच्या त्रासावर फायदेशीर आहे, मासिक पाळीचे त्रास, महिलांच्या समस्या यावर लाभदायी.

मानसिक ताण कमी करण्यास मदत होते. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास उपयुक्त.

चिंता, निद्रानाश, शारीरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी लाभदायी.

स्पॉँडीलिसीस, व्हर्टिगो, स्लीपडिस्क असे त्रास असलेल्यांनी आसन करू नये.