पुन्हा एकदा कामगारांच्या हक्कांसाठी लढाई लढावीच लागेल! 

photo
photo

२१ व्या शतकातील दुसरे दशक संपत आले आहे. १८५७ सालात राणी झाशीच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या विरोधात बंड पुकारले होते. खरे म्हणजे हीच खरी स्वातंत्र्याच्या लढाईची सुरवात. त्यानंतर तब्बल ९० वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले १८८६ साली अमेरिकेतील शिकागो शहरात ८ तासांचा कामाचा दिवस व्हावा यासाठी कामगाराने लढाई पुकारली होती. कारण की, १२-१२ ते १८-१८ तास गुलामाप्रमाणे कामगारांकडून काम घेत असत. १९ व्या शतकात जगभर कामगारांची अवस्था गुलामांप्रमाणे होती. त्याकाळात बाप व मुलगा एकमेकांस ओळखणेही कठीण होते. मुल झोपलेले असतानाच बापाला कारखान्यात कामाला जावे लागे आणि रात्री झोपलेले असतानाच कामावरून घरी येत असे. जगातील कामगाराने एकजूट करून ८ तासांचा दिवस व्हावा म्हणून लढले. लढाईत पोलिस गोळीबारात हुतात्मे झाले. रक्तात पांढरा झेंडा बुडवून त्याचा लाल झेंडा केला व १ मे कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला, कारण कामगारांच्या आंदोलनातूनच आठ तासाची पाळी (शिफ्ट) आणि फॅक्‍ट्री ऍक्‍टचा जन्म झाला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शंभर वर्षांत कामगार आंदोलनाने कामगार वर्गाला बरेच काही मिळवून दिले तो आपला हक्क उपभोगू लागला. बऱ्यापैकी कामगार कायदे तयार झाले. परंतु २१ च्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटच्या वर्षात पुन्हा एकदा कामगार वर्गाला साम्राज्यवादी जागतिकीकरणाच्या विरोधात संघर्ष करावा लागेल. कारण की, १९९२ नंतर खुले आर्थिक धोरण, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण सुरू झाले. त्याचा खरा परिणाम आज जगभर आणि भारतात उघडपणे दिसू लागला आहे. जॉबलेस ग्रोथ सुरू झाली. कायम कामगारांची संख्या कमी कमी होत गेली तर कंत्राटी कामगारांची संख्या जास्त जास्त होत गेली. आतातर आऊट सोर्सिंग सुरू झाले. नोकरीची व वेतनाची शाश्‍वती राहिली नाही. कामाचे तास वाढले ८ तासांची शिफ्ट १२ तासांची आणि आठवड्याचे ४८ तास काम करावे लागे ते आता ७२ तास करावे लागेल. म्हणजे १८८६ साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी ८ तासाच्या दिवसासाठी आंदोलन केले होते तीच वेळ १५० वर्षांनी येथील कामगार वर्गासमोर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. भांडवलदारवर्ग या कामगारांची अमानूष पिळवणूक करून नफा कमवणे हाच त्यांचा छंद आहे. गेल्या १००-१२५ वर्षांत एवढे तंत्रज्ञान विकसित झाले आहे, की उत्पादनाची साधनं आधुनिक, ऑटोमॅटीक होऊन वारेमाप उत्पादन काढू लागले आहेत. विकसित तंत्रज्ञानाचाही उपयोग भांडवलदार नफा जास्त कमावण्यासाठी करू लागला. खरं म्हणजे दिडशे वर्षांपूर्वी जशी कामगारांची पिळवणूक होऊन त्यास अनेक प्रकारचे रोग होत असत. त्याकाळात टी. बी. हाच रोग होऊन कामगाराचा तरुण वयातच मृत्यू होत असे. त्याच्या मृत्युचे कारण म्हणजे १५-१८ तास गुलामासारखे काम करून घेतले जात होते. त्यास वेतन व आरोग्य सेवाही मिळत नसत. तीच परिस्थिती सध्या निर्माण होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या नावाखाली स्थापन झालेले सरकार हे श्रमिक वर्गाकडे लक्ष न देता भांडवलदारवर्गाचे अधिक लक्ष देत आहे. कामगारांचे रानटी, अमानवी शोषण करण्यास परवानगी देऊन भरमसाठ नफा कमविण्यासाठी भांडवलदार वर्गाला मदत करते. तंत्रज्ञान विकसित झाले त्यावर कामगार काम करू लागला तर कामाचे ८ तासांपैकी ६ तासावर आले पाहिजे. एक दिवसात तीन शिफ्ट होत त्याच्या चार शिफ्ट केल्या पाहिजे. म्हणजे २५ टक्के कामगार जास्तीचा लागतो. त्यामुळे बेरोजगारी कमी होते आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मानवजातीचा विकास करणे असेल तर माणूसकी व प्रेम आपसात जपले पाहिजे आणि कामगारांच्या कुवतीप्रमाणे काम आणि गरजेप्रमाणे वेतन त्यास मिळाले पाहिजे. तरच समाज सुखाकडे वाटचाल करू शकेल. असे न होता, सध्याच्या सरकारने कामाचे तास वाढवले, कंत्राटी कामगारांचा भरमसाठ वापर, रोबोचा वापर होऊ लागला म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा न देता भांडवलाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि हे भांडवल बॅंकेमार्फत म्हणजे जनतेच्या पैशातूनच भांडवलदार घेतात. श्रमिकावर सरकारच्या मदतीने बोझा टाकून, कायदे कामगार विरोधी करून, नफा कमविण्याची संधी मालकवर्गाला दिली जात आहे. यामुळे श्रीमंत आणि गरीब यामध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. हिमालयाप्रमाणे धनसंचय होत आहे. देशाचे आर्थिक बजेट जेवढे आहे तेवढी संपत्ती एक-एका घराण्याकडे आहे. हा भांडवली व्यवस्थेचा परिणाम आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोना व्हायरसमुळे जगभर सर्व मानवजात त्रस्त आहे. जगभर त्याविरोधात लढाई सुरू आहे. आपल्या देशात गरीब जनता शारीरिक किंवा बौद्धिक श्रम विकल्याशिवाय तो जगू शकत नाही. यांची संख्या भारतात ८० टक्के आहे. ०.१ टक्के लोकांकडे देशातील ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त संपत्ती आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास ५० कुटूंबच सर्व पातळीवरील सत्ता उपभोगतात. हे सर्व लोकशाही विरोधी आहे. ज्या देशात मताचा सौदा होतो त्या देशात लोकशाही असू शकत नाही. म्हणून खरी लोकशाही देशात प्रस्थापित करावयाची असेल तर वर्गीय चळवळ सामाजिक घटकांना बरोबर घेऊनच करावी लागेल. तरच समाज सुखी व चांगले जीवन जगू शकेल. गेल्या शंभर वर्षांत आपण पाहत आहोत ती भांडवली व्यवस्था सुखी समाज करण्यापेक्षा श्रीमंत व गरीब वर्ग निर्माण करते. गरीब सर्व सुखसोईपासून वंचित आणि समाजातील १ टक्के म्हणजे मुठभर लोक शोषण व्यवस्थेवर विश्‍वास ठेवून पिळवणूक करतात आणि भांडवली व्यवस्थेचे फायदे घेतात. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षात कधी नव्हती एवढी बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अन्याय व गुन्हेगारी वाढू शकते. त्यामुळे सुखी समाज निर्माण करण्यासाठी जगातली श्रमिक वर्गाची, मजदूर-किसान एकजूट आणि संघर्ष करावा लागेल. हिच १ मे कामगार दिनाची हाक आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com