ऑनलाइन शाळा अन्‌ डोळ्यांची काळजी

- डॉ. नंदिनी बिराजदार, बाल नेत्रतज्ज्ञ, सोलापूर
गुरुवार, 18 जून 2020

ऑनलाइन शाळेचे फायदे आहेत. जसे की सोशल डिस्टंसिंगचा विषयच नाही, त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी. मुले सुरक्षित व पालक निश्‍चिंत. पण त्याचबरोबर याचे तोटेही आहेत. स्क्रीन टाइम वाढ, इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी हवी, जास्तीच्या खर्चाचा बोजा, ग्रामीण भागात स्मार्टफोन कनेक्‍टिव्हिटीचा अभाव, एकूणच यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती, डोळ्यांवर वाईट परिणाम. असे फायद्यांपेक्षा तोटे जास्त दिसतात. यासाठी काही शाळांनी ऑनलाइन व ऑफलाइनचा समन्वय साधला आहे. 60 मुलांचा वर्ग, पैकी 20 मुलांची एक बॅच करून दोन दिवस शाळा अशाप्रमाणे विभागून उर्वरित दिवस पेन ड्राइव्हवर ऑनलाइन शाळा स्वागतार्ह पर्याय समोर आला आहे. पण याचा कितपत फायदा व तोटा हे येणारा काळच ठरवेल. 

जून महिना उजाडताच पालक, विद्यार्थी व शिक्षकांना शाळेचे वेध लागले. शाळा ऑनलाइन होतील का, ऑनलाइन क्‍लासेस कितपत योग्य, पुस्तके वह्या मिळतील का, मुलांच्या सुरक्षेचे काय, फी भरूयात की नको, मुलांच्या डोळ्यांचे काय, असे नानाविध प्रश्‍न यानिमित्त पुढे आले आहेत. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार अशी घोषणा केली. दूरदर्शन प्रसारण माध्यमावर शाळा कंडक्‍ट करणे स्तुत्य; पण अंमलात येऊ शकले नाही व शाळा ऑनलाइन झाल्या. 

ऑनलाइन शाळेचे फायदे आहेत. जसे की सोशल डिस्टंसिंगचा विषयच नाही, त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी. मुले सुरक्षित व पालक निश्‍चिंत. पण त्याचबरोबर याचे तोटेही आहेत. स्क्रीन टाइम वाढ, इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी हवी, जास्तीच्या खर्चाचा बोजा, ग्रामीण भागात स्मार्टफोन कनेक्‍टिव्हिटीचा अभाव, एकूणच यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती, डोळ्यांवर वाईट परिणाम. असे फायद्यांपेक्षा तोटे जास्त दिसतात. यासाठी काही शाळांनी ऑनलाइन व ऑफलाइनचा समन्वय साधला आहे. 60 मुलांचा वर्ग, पैकी 20 मुलांची एक बॅच करून दोन दिवस शाळा अशाप्रमाणे विभागून उर्वरित दिवस पेन ड्राइव्हवर ऑनलाइन शाळा स्वागतार्ह पर्याय समोर आला आहे. पण याचा कितपत फायदा व तोटा हे येणारा काळच ठरवेल. 

सुरवातीला उन्हाळ्याची सुटीत मजा केल्यानंतर सर्वांना वाटले सर्व स्थिरस्थावर होईल, पण कसलं काय "कोरोना वाढता वाढे व लॉकडाउनही' अशी स्थिती झाली. नेहमी 10 ते 12 तास शाळा, ट्यूशन, क्‍लासेस, अभ्यास यात गर्क असणारी मुले घरी गुंतवायची कशी हा यक्षप्रश्‍न पालकांसमोर निर्माण झाला. मे महिन्यात मामाच्या गावाला न जाता आल्याने मुलांचा हिरमोड झाला. त्यामुळे सर्व पावले इंटरनेटकडे वळली. तसेही सध्या मुले सहा महिन्यांची होत नाही तर मोबाईलवर कार्टून पाहतात व पाच - सहा वर्षांची मुले स्मार्टफोन पेक्षाही स्मार्टपणे मोबाईल हाताळतात. 
म्हणून असे वाटते की ही पिढी म्हणू शकेल, 
नेट पॅक देगा देवा, स्क्रीन टाईम हवाहवा 
कनेक्‍टिविटी हवी आम्हा, गूगल, यूट्यूब हवे हवे 
अशाप्रकारे नेट सिरीज, मुव्हीज, गेम्स, कार्टून्स सुरू झाले व स्क्रीन टाइम वाढला आणि आता त्यात भर पडेल ती ऑनलाइन शाळांची. यामुळे पालकांना एक चिंता सतावू लागलीय ती म्हणजे, आपल्या चिमुकल्याच्या डोळ्यांचे काय होईल...? मोबाईल, कॉम्प्युटरच्या सतत हाताळण्याने होणारे दुष्परिणाम व त्यावरचे उपाय यानिमित्त जाणून घेऊया. 
डोळ्यावर होणारे परिणाम 
- डोळे लाल होणे 
- डोळ्यात कचकच होणे 
- डोळ्यातून पाणी येणे 
- डोळ्यांवर ताण जाणवणे (asthenopia) 
- डोळेदुखी व डोकेदुखी 
- डोळ्यांची भगभग होणे 
- डोळे थकणे (fatigue) 
- अंधूकपणा जाणवणे ( blurred vision ) 
- क्वचित डबल दिसणे (diplopia) 
- डोळ्यात कोरडेपणा जाणवणे 
- मान-पाठ दुखणे 
- एकूणच या सर्वांमुळे झोपेवर विपरित परिणाम 

अशी घ्या डोळ्यांची काळजी 
- अनावश्‍यक स्क्रीन टाइम कमी करा (उदा. गेम्स नेट सिरीज) 
- पूर्वीपासून चष्मा असेल त्यांनी नंबर नेत्र तज्ज्ञांकडून तपासून घ्या 
- योग्य सकस आहार घ्या, भाज्या, फळे खा, भरपूर पाणी प्या व व्यायाम करा 
- कॉम्प्युटर स्क्रीन व डोळ्यांत कमीत कमी 40 सेंटिमीटरचे अंतर असावे 
- मॉनिटर डोळ्यापासून लांब असावा व थोडा टिल्टेड असावा 
- डोळ्यांच्या लेवलपेक्षा मॉनिटर चार ते पाच इंच खाली असावा 
- डायरेक्‍ट लाइट डोळ्यावर पडू नयेत ते पाहा, लाइटचा ग्लेयर कमी असावा 
- एसीचा एअरफ्लो डायरेक्‍ट डोळ्यावर नको 
- कमीत कमी 20 मिनिटांनी 20 फूट लांब बघावे व 20 वेळा डोळे उघडझाप करावे 
- शक्‍य नसल्यास अभ्यास करताना दोन तासांनी 20 मिनिटांचा ब्रेक घ्यावा 
- डोळ्यांचा व्यायाम म्हणून डोळे आवर्जून उघडझाप करावेत 
- अधून-मधून डोळे बंद करून बुबळ आतल्या आत उजवीकडे व डावीकडे फिरवावेत 
- डोळे बंद असताना डोळ्यांवर हात ठेवून मोठा श्‍वास घ्या, श्‍वास सोडत हळुवार डोळे उघडा 
- डोळ्यांवर काकडीचे काप ठेवल्याने थकवा काही अंशी दूर होतो 
- डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉपचा वापर करावा  
 
इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या