माणूस पैशांचा नाही, तर प्रेमाचा भुकेला...

माणूस पैशांचा नाही, तर प्रेमाचा भुकेला...

ओझर आणि लेण्याद्री म्हणजे नवरोबाचं आवडतं ठिकाण होय. कधीही म्हटलं त्याला की दोन-तीन दिवस फिरायला कुठं जायचं तर त्याचं उत्तर ठरलेलं असतं. ओझर लेण्याद्रीला जाऊ. पिकनिक म्हटलं की आम्ही सुपर एक्साईटेड असतो. मग काय लगेच आमचं ओझर-लेण्याद्रीला जायचं ठरलं. आणि तयारीही सुरू झाली. 

शेवटी तो जायचा दिवस उजाडला. अन् आम्ही जायला निघालो. आदल्या दिवशी रात्रीच आम्ही बॅग भरुन ठेवल्या होत्या. सगळं गरजेचं सामान घेतलं. सगळी तयारीही झाली होती. भल्या पहाटे आमचा प्रवास सुरू झाला. पुणे-मंचर-राजगुरुनगर आम्ही असं एक एक ठेपं पुर्ण करत ओझरला पोहचलो.

इतरांपेक्षा आमचा पिकनिकचा concept मुळी वेगळाच आहे. म्हणजे मस्त गाडीत गाणी ऐकत, ऑन द वे ब्रेकफास्ट, लंच करत निवांत स्पाॅटला पोहचायचं. पुणे-ओझर अंतर जरी फार नसलं तरी आम्ही सांयकाळी 4.30 पर्यंत तिथे पोहचलो. मग छान हॅाटेलला जाऊन बॅग ठेवून फ्रेश झालो.

आम्ही ओझरला गेलो की दरवेळी रात्रीची साडेदहाची गणपतीची आरती नित्यनेमाने करतो. मग फ्रेश झाल्यावर मंदिराजवळ भिमा नदीमध्ये मस्त बोटींग केलं. मग बोटींग झाल्यावर चहा घेतला. असं सगळं आटोपता आटोपता आरतीची वेळ झाली.

आम्ही सगळं आवरल्यावर मंदिरात गेलो. निवांत देवाकडे बघत नामस्मरण करण्यात जे सुख आहे ना ते इतर कशातच नाही. मनोभावे हे सगळं करताना अचानक गुरुजींनी आरतीचं ताट आपल्या हातात दिलं की अगदी सोने पे सुहागा. देवाचं दर्शन घेवून आलो आणि शांत झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी लेण्याद्रीला सकाळी लवकर निघायचं होते.

आम्ही जेव्हा जेव्हा ओझरला जातो तेव्हा तिथे एका आजी-आजोबांचा घरगुती पद्धतीने छोटासा restaurant चा सेटअप आहे. आम्ही नेहमी तिथेच जेवण करतो. आजी खूप छान चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ बनवितात. त्या आजींचा पेहराव म्हणजे, आपली महाराष्ट्रीयन नववारी साडी. कपाळाला लावलेलं ठसठशीत लाल कुंकवू आणि नाकात नथ. आजोबा मस्त सदरा आणि पायजमा आणि डोक्यावर टोपी घालतात.

आम्ही नेहमी गेलो की हे दोघेही आपुलकीने आमची आणि बाळाची चौकशी करतात. त्यांना ज्या ज्या वेळी भेटू त्या त्या वेळी वाटतं आमच आणि याचं काहीतरी नातं असावं. आजीला एक नातू आहे. आता तो दुसरीत जातो. मागच्या वेळी आम्ही गेलो तेव्हा फक्त एक नातू होता. आता यावेळी त्याला एक छोटीशी बहिण झालेली होती. तसेच आजीकडे सुट्टीला लेकीची मुलगी म्हणजे दुसरी एक नातही आली होती. त्यामुळे आजी फारच खुश होत्या.

आपण जनरली restauarant ला जेवायला गेलो कि waitor साठी टीप ठेवतो. पण इथं टीप देवून त्यांच्या प्रेमाची किंमत केल्यासारखं वाटतं. म्हणून आम्ही सकाळी पुन्हा एकदा विघ्नेश्वराचं दर्शन घ्यायला गेलो. तेव्हा तेथून येताना आजींच्या छोट्या लेकरांसाठी खेळायला बॉल, नातीसाठी बांगड्या, नविन जन्मलेल्या बाळासाठी खेळणी असं घेवून आलो. आजी-आजोबांना च् त्या खेळणी सोपविल्या. त्या खेळणीकडे पाहून त्या लहान जीवांना खूप आनंद झाला. हे सगळं आवरलं अन् तेथील आठवणी मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आजी-आजोबांच्या डोळ्यातील प्रेम, आपुलकी कायमस्वरूपी मनात साठवली गेली. पैसा काय आज आहे नी उद्या नाही. पण माणूस प्रेमाच्या दोन शब्दांचा भुकेला असतो हेच खरं लाखमोलाचं सत्य होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com