तुझ्या आठवांचा पुन्हा पावसाळा...

पावसातील तो मातीचा सुगंध, आणि तुझ्या हसण्यामधला गंध याचा भास मला व्हायला लागला.
तुझ्या आठवांचा पुन्हा पावसाळा...

पावसाळा तसा नेहमीच येतो. कधी झोंबणारा गार वारा घेऊन, कधी मनात दडलेल्या आठवणींला जागवून. कधी दळवणाऱ्या मातीच्या सुगंधाला घेऊन. आपण दोघांनी मिळून असे कितीतरी पावसाळे मिळून चिंब केले. आपल्या धुंदीने बदलणाऱ्या ऋतूला कवेत घेवून जगावरच थांबवले. तू आलीस की पावसाळा यायचा, तू गेलीस की किलबिलाट करणाऱ्या पक्षाला आपले झाडेही पोरके वाटायचे.

आता पावसाळा सुरू झाला आणि मला तुझ्या असण्याची चाहूल लागली. पहिल्या पावसातील तो मातीचा सुगंध, आणि तुझ्या हसण्यामधला गंध याचा भास मला व्हायला लागला. पावसाची रिपरिप आणि मनातली एकटेपणाची पोकळी याचा ताळमेळ कसा बसवावा हेच आता हल्ली कळत नाही.

त्या बरसणाऱ्या पावसात मी अमिताभ व्हायचो आणि तू मोसमी चॅटर्जी. मग वाटेल तिकडे तुझा हात हातात घेऊन मनसोक्तपणे फिरायचं. आणि, छानपैकी तेच गाणे गायचे आहे." अगदी सेम टू सेम..

रिमझिम गिरे सावन

सुलग-सुलग जाए मन

भीगे आज इस मौसम में

लगी कैसी ये अगन

रिमझिम गिरे सावन...

आजही पाऊस पडला की, मला हेच गाणं आठवते आणि आणि तुझा सहवास पण.

Heavy Rain
Heavy Rainesakal

पाऊस पडला की मी खूप बडबड करायचो आणि तू मात्र, तुझ्या गालाला हात लावून निवांत त्या पावसाला न्याहळत बसायची. छत्रीसोबत असूनही तिचे काय काम. पाऊसही बघ ना, तू सोबत असतांना नेहमी पडायचा, त्या पावसात अंग ओले व्हायचे आणि मन चिंब भिजायचे. असे वाटायचे हा पाऊस असाच कोसळत राहावा. ऋतूने कधी कूस बदलूच नाही. डोळ्यांनी पापणी कधी लवूच नाही.

मला सतत वाटायचे आपण एकदम अल्लडपणे त्या पावसात भिजत भिजत नाचावे. तू शांत असली तरी त्या पावसात तुझे सौंदर्य आणखीनच खुलून जायचे. मी पावसाचा आनंद घ्यायचा सोडून तुलाच बघत राहायचो जणू माझ्यासाठी तूच माझा पाऊस होतीस.

rain
rainrain

आज पावसात परत एकदा तुझी आठवण झाली. पाऊस आल्याने नेहमीच मी अस्वस्थ होतो. कारण मनात तुझ्या आठवणींचा कल्लोळ दाटून येतो. अनेक स्वप्न आपण या पावसात पाहिले होते. ते स्वप्न स्वप्नच राहिले. जशा माणसांच्या वाटा वेगळ्या आहेत, तशा स्वप्नांच्या वाटाही विभिन्न आहेत. नाही का? हे वास्तव आहे, तरीही मातीच्या या सुगंधाची धुंदी सतत तुझी आठवण करून देत राहते. मनात तुझे असणे कोरीव करून देत राहते. पाऊस जोरात बरसतो आणि तुझी आठवणपण.

- संदीप काळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com