चिमणीला खाऊ-घर दिलंच पाहिजे! 

The sparrow must feed!
The sparrow must feed!

चिमणीसाठी अन्न, पाणी, घरटी यांची सोय आपण करावी की नाही याविषयी निसर्गप्रेमींमध्ये दोन गट आहेत. बाकीच्या वन्य प्राण्यांप्रमाणेच चिमणीलाही असलेली अन्नपाणी व निवारा शोधण्याची नैसर्गिक सवय मोडेल आणि त्या कायमस्वरूपी आपल्या आश्रित-परावलंबी होतील. परिणामी आपत्तीत तग धरून राहण्याची त्यांची क्षमता संपेल असं त्याचं मत आहे. दुसऱ्या गटाचं म्हणणं असं की, चिमणी अनादी काळापासून मानवावरच ती अवलंबित आहे. आता माणसांनीच तिच्यावर संक्रांत आणली आहे. त्यामुळे अन्न, पाणी, निवारा उपलब्ध करून देणे आपलेच कर्तव्य आहे. 


आता ही गोष्ट खरीच आहे की माणसाशी तिचं सानिध्य फार जुने आहे आणि तिची संख्या घटण्याचं कारणही तोच आहे. तिच्या उत्क्रांतीचा इतिहासही तेच सांगतो. शेतीच्या शोधाबरोबर ती माणसांच्या जवळ आली. त्याआधी ती पूर्णतः वन्य होती. चिमणीचा "डीएनए' अभ्यासही तेच दर्शवतो. चिमणींच्या पूर्वजांचे अवशेष हेदेखील इस्रायलमधील एका गुहेत मानवी अवशेषांसोबतच सापडले होते. तिच्या शरीरात दोन जनुकीय बदल झाले. पहिला म्हणजे दाणे टिपण्यासाठी तिच्या कवटीचा व खालच्या जबड्याच्या आकार बदलला. आणि दुसरे म्हणजे तिच्या आतडीत स्टार्च (तृणधान्यातील मुख्य घटक) पचविण्याची क्षमता निर्माण झाली. हे दोन्ही जीन्स आजच्या घरगुती चिमणीत विकसित झालेले आहेत आणि मध्य-पूर्वेत आजही आढळणाऱ्या बॅक्‍ट्रीऍनस चिमणीत मात्र ते नाहीत. म्हणजेच माणसाने पिकविलेली धान्ये खाऊन गुजराण करण्यासाठी घर चिमणीत हे दोन बदल झाले. 


चिमण्या माणसांबरोबरच जगभर फोफावल्या असल्या तरी गेल्या दशकभरात मात्र त्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. त्याची अनेक कारणे आहेत. आरसीसी घरांमध्ये घरटे बनविण्यास योग्य अशा जागा नाहीत. प्रदूषण आहेच. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे त्यांना खाण्यायोग्य किडे आणि धान्य मिळत नाही. मोबाईल टॉवरच्या लहरींचा प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणामाचा दावा केला जातो. ही कारणे माणसाशीच संबंधित आहेत.

त्यामुळे चिमणीला अन्न देणे, कृत्रिम घरटी देणे योग्यच आहे. उन्हाळ्यात पाणी द्यायलाही हरकत नाही. बाकीच्या वन्य पशुपक्ष्यांना इथे निकष नकोत. मात्र चिमण्यांना तयार अन्नधान्याचे दाणे टाकणे मात्र चूकच. कारण माणसाने पिकवलेलेच धान्य का असेना पण ते शेतात जाऊन स्वतःचे स्वतः मिळविण्याचा त्यांचा संघर्ष असतो. तयार अन्न मिळाले तर त्या तो संघर्षच विसरतील. त्या ऐतखाऊ होतील. आणि पुढे एखादी भयानक नैसर्गिक आपत्ती आली तर त्या सांगली, कोल्हापूरच काय जगातूनच कायमच्या नामशेष होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com