तथागतांचे चरित्र आजच्या लोक जिवणासाठी अत्यावश्यक 

तथागतांचे चरित्र आजच्या लोक जिवणासाठी अत्यावश्यक 

देशाला थोर महापुरुष विवेकी त्यासोबत महान साधुसंतांची मोठी परंपरा आहे. त्यामुळेच हा देश जगात महान आहे. हा देश विविध धर्मानी पंथानी जरी नटलेला असला तरी प्रत्येक धर्माची शिकवण ही मानवतेच्या कल्याणाचीच आहे. याची जाण या देशातील नागरिकांत आहे. त्यामुळेच भारतात जितक्या विचारधारेचे प्रवाह आहे, तितके जगात असतीलच याची खात्री देता येत नाही. थोर साधूचे विचार हे अखंड पृथ्वीवर असणाऱ्या मानवाच्या कल्याणासाठी असतात म्हणून त्यांच्यात माझा आणि तुझा याचा विसर पडलेला असतो, म्हणूनच एक संन्याशी बिरुदावली या विशेष ईश्वरी अवतारासमोर लागते. 

भगवान गौतम बुद्ध हे दयेचे सागर होते, जसे महासागरात कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी सागर गंभीर आणि स्थिर राहते तसे यांचे चरित्र आहे. आपल्याकडून सर्वसम्मत आणि उपयोगी असेच तत्वज्ञान सांगितले गेले पाहिजे. ज्यामुळे ही भोळीभाबडी गरीब माणसे या रस्त्याने चालतील आणि स्वतः उत्कर्ष करून घेतील. श्रेष्ठ पुरुषाचे आचरण हाच उद्याचा धर्म असतो, त्यामुळे या श्रेष्ठ पुरुषांच्या खांद्यावर मोठी समाज कल्याणाची जबाबदारी असते. 
भगवान गौतम बुद्धाचे अनुयायी खूप असत. त्यांचे विचार म्हणजे साक्षात अमृताची वाटिच किती प्राशन करणार, कारण अमृताचा एक थेंब घेतले तर मृत्यू टळतो मग यांच्या वाणीतून तो अखंड स्त्रवत असल्याने किती मानवाचे चैतन्य अजरामर झाले असतील त्याची नोंद घेणे कठीण आहे. 

दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती असे एक संत वचन आहे आणि या तीन गुणांचे ते महासागर होते म्हणून ते सिद्धार्थ या नावावरून गौतमबुद्ध झाले. म्हणतात ना नर कुछ करणी करे तो नर का नारायण बने असं जे म्हणतात ते कदाचित भगवान गौतम बुद्धाच्या चरित्रावरूनच लिहिले गेले असेल अशी मला तरी खात्री झाली. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत, तुम्ही कोणते गुणसंपन्न असले पाहिजे ज्यामुळे तुमचे कल्याण होईल या विचारांचे ते एक विद्यापीठ होते. माणसांमाणसात कुठलाच भेद असू नये सूर्य एकच आहे. कपडा एकच असतो तो ज्या धाग्याने तयार होतो, तो एकच परंतु ज्यांना जो रंग आवडतो त्याचा तो रसिक होतो. पण मूळ पाहिले तर सर्व तंतू असतात. पृथ्वीवर असणाऱ्या नद्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी शेवटी त्या मिळतात एकाच ठिकाणी. हीच शिकवण सर्व धर्मात सांगीतलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडून कोणाचाही मत्सर घडू नये, द्वेष उत्पन्न होऊ नये, तुम्ही मनानी शुद्ध असले पाहिजे अशा थोर विचारांचे बुद्ध हे हिमालय पर्वत होते म्हणून ते भगवान झाले. एक शिध्य त्यांना प्रश्न विचारतो, तो असा की 
मानवाचे अधःपतन लवकर कशाने होते? 
यावर भगवान गौतम बुद्धाने दिलेले उत्तर हे मानवाच्या असंख्य पिढीसाठी कायम आदर्श राहील असेच होते. ते म्हणाले तु प्रश्न फारच चांगला विचारलास आता एक कर तु माझ्या सोबत चल असे म्हणून निघतात. सोबत शिष्याला दोन भोपळे घेण्याचे आज्ञा करतात पुढे प्रवासात पान्याचा तलाव लागतो. तो जवळ येताच शिष्याला आज्ञा देतात तुझ्या हातातील भोपळा पाण्यात टाकून दे, हे ऐकताच शिष्याने तो भोपळा पाण्यात फेकून दिला. दोघेही जागेवर थांबले थोड्या वेळाने त्यातील एक भोपळा पाण्यात बुडाला आणि एक अलगद तरंगत होता, या वर भगवान गौतमबुद्ध शिष्यास म्हणाले एक तरंगला आणि एक बुडाला असे कसे झाले असा प्रति प्रश्न विचारला. यावर शिष्य म्हणाला बुडाला त्याला छिद्र असेल यावर बुद्ध म्हणाले तू उतर सुद्धा काय छान दिलेस वा, असेच मानवी जीवनाचे असते अनेक दुर्गुनाची छिद्र मानवाला कवटाळतात आणि त्यामुळे ते या संसारात बुडून जातात. यात काम, क्रोध, लोभ, मत्सर, असे नाना अवगुणाचे छिद्र ज्या माणसाला घेरतात त्यांचे अधःपतन लवकर होते. मला वाटते अशा ज्ञानाच्या सागरातून एक थेंब जरी दैनंदिन घेत राहिलो तर पाण्यावर तरंगणाऱ्या भोपळ्या प्रमाणे अलगदपणे मानवी जीवन तरुण जाण्यास मदत होईल 
अशा धगधगत्या जीवनात गर्दीत नौका पार पडेल. आशा थोर ऋषी मुनी, योगी, तपी, जपी, ज्ञानी भगवान गौतम बुद्धाचे आज वैशाख पौर्णिमेला जयंती निमित्य स्मरण करत आपली देहनौका या संसाराचा सागरातून पार करूयात आणि दुर्गुणरूपी छिद्रापासून दूर राहुयात. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com