रॉकेल विकणारा 'बॉस' इंधन सम्राट कसा झाला? वाचा जिद्दीची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boss Fiza

रॉकेल विकणारा 'बॉस' इंधन सम्राट कसा झाला? वाचा जिद्दीची कहाणी

बॉस फिझा हा झिम्बाब्वे देशातील मस्विंगो या पारंपरिक शहरात राहतो. या साध्या शहरात सर्वांत श्रीमंत आणि आलिशानपणे राहणारा माणूस म्हणून त्याला ओळखले जाते; पण त्याची ही ओळख एका दिवसात बनलेली नाही. अनेक वर्षांचे श्रम करून तो इथंवर पोहोचला आहे. त्याचे आई-वडील एका छोट्याशा शेताचे मालक होते. पाच भावंडांमध्ये तो एकटाच मुलगा होता. त्यामुळे शेतीच्या कामात त्याला मदत करावी लागत असे.

घरापासून सात किलोमीटर अंतरावरील शाळेत तो रोज चालत जात असे. जिद्दीने तो अविरतपणे कष्ट करत राहिला; पण हायस्कूल पूर्ण झाल्यानंतर तो पुढचे शिक्षण घेऊ शकला नाही. घर चालवण्यासाठी त्याने एक छोटीशी नोकरी पकडली ती रॉकेलचे टँकर घेऊन जाण्याची. ड्रायव्हरकी करताना एक दिवस त्याला वाटले की असाच आपलाही व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. मग त्याने थोडे कर्ज काढून एक छोटीशी रॉकेलची गाडी घेतली. शहरभर फिरून तो रॉकेल विकू लागला. एके दिवशी त्याला कळले की शहरातील एक रॉकेलचे दुकान विकायचे आहे. मग तो तिथे चौकशी करायला गेला.

ते दुकान तोट्यात चालत होते. त्याने ते दुकान खरेदी केले. हळूहळू त्याचे दुकान चालू झाले. हा उद्योग फायद्यात आला. मग त्याने आणखी एक दुकान सुरू केले. असे करत करत शहरभर त्याची दुकाने झाली. तो मग पेट्रोलही विकू लागला. त्याने स्वतःचा पेट्रोल पंप खरेदी केला. इंधन या व्यवसायातच हळूहळू त्याची प्रगती होत राहिली, यासाठी तो स्वतः कष्ट घेत राहिला. आता कुणाला इंधन हवे असेल त्याला ते जागेवर नेऊन देणे, हे तो आपले कर्तव्य समजत असे. फेरीबोटीला असो किंवा कोणाच्या गाडीला असो, तो इंधन पुरवत असे. या क्षेत्रात त्याचा जम बसत गेला आणि संपूर्ण झिम्बाब्वे देशात त्याची अनेक गॅस स्टेशन्स झाली. आज तो या देशाचा इंधनसम्राट म्हणून ओळखला जातो. त्याला यश मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीची खूप साथ लाभली. तिने सतत त्याला नवनवीन गोष्टी करायला प्रोत्साहन दिले.

बॉसने आपल्याला यश मिळाल्यानंतर अनेकांना मदत केली. विशेषतः विद्यार्थ्यांना तो आवर्जून मदत करत राहिला. गरीब विद्यार्थी ज्यांच्याकडे शाळेला, कॉलेजला जायला वाहन खर्च करण्याची ऐपत नाही, अशांना वाहनात घालायला तो मोफत इंधन देतो. अनेक विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन शिकण्यासाठी त्याने शिष्यवृत्ती दिली आहे.

‘मला माहीत नव्हते की एवढे यश मला मिळेल; पण मी फक्त प्रयत्न करत राहिलो आणि माझे प्रत्येक काम उत्कृष्ट कसे होईल, हे पाहत राहिलो.’ आपल्या यशाचे रहस्य सांगताना बॉस असे सांगतो.

शारीरिक आणि मानसिक कष्ट करण्याची तयारी असेल, तर तुम्हाला यश मिळतेच.

यश... इंधन उद्योगातील महारथी

संघर्ष... अत्यंत तुटपुंज्या साधनातून व्यवसायास सुरुवात

२३ ः विषुव दिन

२५ ः सर्वपित्री अमावास्या,

भादवी पोळा, जागतिक कन्या दिन (सप्टेंबरचा चौथा रविवार)

२६ ः घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ, संत मुक्ताबाई जयंती,

आश्विन मासारंभ

२८ ः कर्णबधिर दिन.

Web Title: Stubbornness Story Kerosene Become Fuel Emperor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..