गोव्यातील मनस्वी कवियत्री–शीला जयवंत : Sheela Jaywant recently released The First Book of Indlish Poems | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sheela Jaywant

Sheela Jaywant: गोव्यातील मनस्वी कवियत्री–शीला जयवंत

Sheela Jaywant : गोव्याच्या लोकप्रिय कवियत्री शीला जयवंत यांचं `द फर्स्ट बुक ऑफ इंडलिश पोएम्स’ नुकतच हाती आलं. त्यात 27 कविता आहेत. मुंबईत जन्मलेल्या, शिकलेल्या शीला जयवंत या 1996 पासून गोव्यात राहात आहेत. त्यांची आई गोव्याची. शीला जयवंत यांनी तेथे खाजगी शाळातून व्यवस्थापकाचं काम केलय. जयवंत यांच्या वेगवेगळ्या राज्यात झालेल्या बदल्यांमुळे श्रीमती शीलाही महारष्ट्राव्यतिरिक्त राजस्तान, तामिळ नाडू, जम्मू व काशमीर आदी राज्यातून राहिल्या.

त्यांच्या कविमनानं या भ्रमंतीत अनेक गोष्टी अनुभवल्या व नजरेनं टिपल्या. एकाच शब्दाला निरनिराळ्या राज्यात कसं वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं, याची काही उदाहरणं त्यांनी त्यांच्या पुस्तकात तर दिली आहेतच, परंतु, त्यांच्या इंग्रजी कविता ज्याला त्या `इंडलिश’ म्हणतात, त्या विनोदी तर आहेतच, तसंच त्या आशयपूर्णही आहेत. त्या म्हणतात, ``बंबय्या हिंदीमध्ये बटरला मस्का नव्हे, मख्खन, कांद्याला प्याज, साखरेला चीनी, पावाला डबल रोटी अशी नामकरणं झाली आहेत.’’ त्यांनी कवितेसाठी निवडलेले विषयही अफलातून आहेत.

मुंबईतील एका रुगणालयात काम करताना त्यांना आलेल्या अनुभवातून उतरलेली `ए डेथ ऑन द टेबल’ ही कविता मरणाच्या दारात उभ्या असलेली व्यक्ती, त्याची पत्नी, रूग्णालयातील रजिस्ट्रार आणि त्या वक्तीचे हितचिंतक कायकाय विचार करीत असतील, याचं मोठं मनोरम चित्र त्या उभ्या करतात.

करोनाने झालेल्या लॉक डाऊनच्या काळात ज्येष्ठांनी काय केलं, यावर आधारित त्यांची `ए सिनियर सिटिझन्स लॉक डाऊऩ इन व्हर्स’ ही कविता ज्येष्ठानांच नव्हे, तर तरूण तरूणींनाही हॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री ज्युली अँड्र्यूजच्या `माय फेव्हरिट थिंग्ज’ या `साऊंड ऑफ म्युझिक’ मधील गाण्याची आठवण करून दिल्याशिवाय राहाणार नाही.

कार्पोरेट विश्वातील तेच ते कंटाळवाणं जीवन `टू सेल वन्स सोल टू ए कार्पोरेट गोल’ या कवितेत हुबेहूब उतरलय. रूग्णालयात व्यतीत केलेल्या दिवसांचा त्यांच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला, की त्यातून `इनडिव्हज्युल नीड्स,’ `इनॉक्युलेश टाईम,’ `फ्रूट ज्यूस स्टॉल आउटसाईड ए हॅस्पिटल’ या कविता त्यांनी या संग्रहात लिहिल्यात आहेत.

शीला जयवंत यांना पाककलेची भारी आवड. त्यामुळे निरनिराळे चविष्ट पदार्थही त्यातून सुटलेले नाहीत. सर्वसाधारणतः कविता वाचताना कुणाला भूक लागत नाही. पण, त्यांच्या `कोकणी करीड क्रॅब,’ `मील इन ए सॅंडविच,’ `क्वीन ऑफ रोटीज्-पुरण पोळी,’ `राईस पुरी विथ ग्रॅव्हीज्,’ `धिस इज द वे वि मेक दडपे पोहे,’ `वि कॉल इट लखनवी ऑम्लेट,’ `स्वीट कोकोनट वडी,’ `अ द्रक टू फ्लेवर ए स्वीट’ या वाचताना जाम भूक लागल्याशिवाय राहात नाही. शालेय जीवन, त्यातील शिक्षक व विद्यार्थ्यातील प्रसंग, मुंबईच्या शिवाजी पार्क मधील मध्यमवर्गीयांचे जीवन, यावर त्या प्रकाशझोत टाकतात. तसंच, `अनसीझनल रेन इन गोवा,’ `हू इज राँग हू इज नॉट,’ `ए नॉट सो ओल्ड बिल्डिंग,’ `मुंबई नो लॉंगर बॉंम्बे,1990 ज्.’ या व अन्य कविताही वाचनीय आहेत.

त्यांची सर्वांना आवडेल, अशी अफलातून कविता आहे, आपल्या लाडक्या मोबाईल फोनबाबत, ती अशी.

कवितेचं शीर्षक आहे, डियर फोन

विथ यू इन माय पर्स, डियर फोन

आय नेव्हर फील अलोन,

विथ यू इन माय पाम,

आय एम काम,

माय फिंगर्स लिटली टॅप,

यूअर की बोर्ड अँड मॅप,

आऊट माय थॉट्स ऑन स्क्रीन.,

पुटींग इन बिटविन

सम इमोशन्स,

सम आयकॉन्स,

यू आर द लिंक टू द वर्ल्ड,

इव्हन इफ आय एम करल्ड,

कोझिली इन माय बेड,

अपऑन ए पिलो रेस्टींग माय हेड,

वॅचिंग यूवर ब्लुइश लाईट,

चिअर्स अप मान नाईट.

आय एम नो लॉंगर लोनली,

बिलव्हेड्स आर ओनली

ए व्हॉट्सअप अवे,

कॉनव्हर्सेशन्स, कनेक्शनस्, सेव्हरल टाईमस् ए डे.

नॉट जस्ट थ्रू द लॉकडाऊन, इन्हन बिफोर,

आय डिपेन्डेड ऑन यू , फोन माय स्टेट ऑफ आर्मर,

टू स्र्कोल अराऊंड अँड एक्रॉस द वर्ल्ड वाईड वेब

अलाउंइंग माय माइंड टू फ्लो ऑऱ एब,

फाईँड फ्रेन्ड्स ऑन फेसबुक,

न्यू रेसिपीज टू कुक,

पेडॅगॉगीज फॉर टीचर्स

अँड अदर फॅक्ट फाईंडिंग क्रीचर्स.

टॉकिंग टू माय सन

सीम्स सो मच मोअर फन

ऑल व्हिडियो कॉल दॅट अलौ

वन टु भी देअर रिअल टाईम, नाऊ हाऊ

कॅन आय लीव्ह विदाऊट यू, फोन,

यू हॅव ऑन मी ग्रोन

आय डू नॉट ओन यू, सी,

इट्स यू दॅट ओन्स मी

दॅट आय कंडोन,

डियर फोन.