Blog

माधव गोखले
गोष्ट एका खाणीची
शिराली माईन. लांबलचक पसरलेली. मॅंगेनीझचा विटकरी रंग अंगाखांद्यावर मिरवणारी. मॅकेन्नाज्‌ गोल्डची आठवण करून देणारी. अगदी पहिल्यांदा जेव्हा दांडेलीला गेलो तेव्हा जंगलाच्या अगदी ऐन मध्यावर आ वासून पडलेल्या या खाणीकडे जाणारा रस्ताच तेवढा पाहिला होता. कवळा केव्हजकडे जाताना. झाली यालाही वीसबावीस वर्ष. खाणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावरच एक मोठा बांबू किंवा लोखंडी बार आडवा लावलेला. शेजारी रखवालदारासाठी एक आडोसा. त्यानंतर... आणखी वाचा
समृद्धी धायगुडे
ही 'ट्रॅव्हल गॅजेट्‌स' तुमच्याकडे आहेत?
दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात.  मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल डेस्टिनेशननंतर कपडे, अॅक्‍सेसरीजबरोबर गॅजेटस्‌ची लिस्ट केली जाते. या गॅजेट्‌सच्या लिस्टमधील काही वस्तू तुमच्याकडे नक्कीच... आणखी वाचा
समृद्धी धायगुडे
एक अकेली
गुगलच्या सर्च इंजिनला "इंडियन वुमन‘ असा एक साधा सर्च दिला तर चुली फुंकणाऱ्या महिला, दवाखान्यात रांगेत उभ्या असलेल्या गरोदर महिला असे काही फोटो दिसू लागतात. अर्थातच या छायाचित्रांमध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या कर्तुत्ववान महिलादेखील दिसतात; मात्र हे प्रमाण थोडे कमी आहे. थोडेच दिवसांनी गुगलला देखील हे चित्र निश्‍चितच बदलावे लागेल. कारण भारतात पर्यटन व्यवसायाबरोबर एकटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या देखील वाढत आहे... आणखी वाचा
समृद्धी धायगुडे
स्मार्ट कुकिंगसाठी स्मार्ट ऍप्स
नोकरदार महिलांना आपले आयुष्य वेगवान सुखकर करण्यासाठी वेगवेगळी ऍप्स उपयोगी पडू शकतात. स्मार्टफोनमुळे हौशी -गौशी सगळ्या शेफसाठी ही ऍप्स अतिशय उपयुक्त आहेत. त्याचा उपयोगदेखील स्मार्टपणे करून आपले आयुष्य सुखकर होऊ शकते. व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, स्काइप यांचा वापर बऱ्याच स्त्रिया करतात, पण दैनंदिन आयुष्यात आरोग्याशी निगडीत तसेच कुकिंगविषयी इतरही ऍप्स महत्वाची भूमिका बजावू शकतात.  CookWizMe :  गृहिणी तसेच... आणखी वाचा
समृध्दी धायगुडे
पॅकेजिंग क्षेत्र : करिअरची एक नवी वाट
एखादी ग्राहक उपयोगी वस्तू घेतल्यानंतर सबंधित उत्पादन खाद्यपदार्थ असल्यास तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला एक डबा, प्लॅस्टिक बाटली उत्पादन करणारी एक कंपनी त्यावर प्रिंट करणारी एक कंपनी आणि या दोन्ही गोष्टी ते पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीला हा कच्चा माल पुरवतात. पॅकेजिंग करणाऱ्या विविध कंपन्या हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याचे रुपांतर ग्राहकउपयोगी वस्तूंमध्ये करतात. "पॅकेजिंग क्षेत्रा‘चा विस्तार... आणखी वाचा
समृध्दी धायगुडे
वेडिंग प्लॅनर होताना...
लग्न दोन कुटुंबांना जोडणारा प्रसंग असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील ही महत्त्वपूर्ण घटना. त्याच्या व्यवस्थित नियोजनासाठी"वेडिंग प्लॅनर'ची गरज असते. या व्यवसायातील आधुनिक व्यावसायिक "नारायण' होण्यासाठीच्या काही टिप्स : - विवाहाचे व्यवस्थापन हा अतिशय संवेदनशील उद्योग आहे. हे कायम लक्षात ठेवावे. - स्वतःची वेबसाइट डिझाईन करून त्यावर तुमच्या बेस्ट इव्हेंटचे फोटो अपलोड करत राहा. - सतत फोनवर उपलब्ध असणे व ई-मेल्स तपासणे... आणखी वाचा
पल्लवी महाजन
US election
यंदा अमेरिकेतील निवडणूक अनुभवण्याचा योग आला. एक वर्षांपासून नवऱ्याच्या नोकरीनिमित्त आम्ही अमेरिकेत आहोत.आणि मी डिपेंडेंट व्हिसा (H4 ) वर आहे. मला या व्हिसामुळे नोकरी करण्याची परवानगी नसल्यामुळे खूप वेळ मिळतो. यामुळे सहज एकदा इकडच्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीला जाण्याची संधी आली. आम्ही नॉर्थ कॅरोलिना राज्यात असल्यामुळे, या राज्यातील लोकांच्या मतांना प्रचारामध्ये अनन्य साधारण महत्व होत. त्यामुळे हिलरी क्‍लिंटन आणि... आणखी वाचा
अनुवाद व टिप्पणी: सुधीर काळे (sbkay@hotmail.com)
Balochistan agitation
(वाचकांना एक खास विनंती! हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. "बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते. या लेखातील बरेच मुद्दे मला न पटणारे आहेत व ते वाचून मला आश्‍चर्यही वाटले. पण हा एक वेगळा मतप्रवाहसुद्धा "सकाळ'च्या... आणखी वाचा
संतोष धायबर
Narendra Modi's Surgical strike on black money
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेले ‘सर्जिकल स्ट्राइक‘ व काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला ऐतिहासिक धाडसी निर्णयाची चर्चा सुरू झाली अन् मोदी पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आले... मंगळवार (ता. 9) हा दिवस इतर दिवसांप्रमाणेच एक. संध्याकाळी आठच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला अन् अनेकांच्या पायाखालची जमीनच हादरली. काही सेकंदात... आणखी वाचा
उमेश वानखडे, लिटिल रॉक, अमेरिका
donald trump
दहावीचा निकाल बघताना, इंटरव्ह्यूमध्ये पास झालेल्या उमेदवारांची यादी बघताना जी मनात धाकधूक असते आणि अपेक्षित न घडलेले बघून जसा चेहरा पडतो तसेच काहीसे आज अमेरिकेचे झाले. शेजाऱयाला चिमटा काढायला लावून आपण खरोखर एखाद्या भयंकर स्वप्नात तर नाही ना असले काहीसे अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या बाबतीत झाले. वर्षापूर्वी चालू झालेले हे पालुपद असल्या निकालावर येऊन थांबेल, असा विचार बऱ्याच कमी लोकांनी केला असेल. शेवटी द्वेष... आणखी वाचा
अनामिक
Pune Traffic
मी पुण्यात लॉ ची विद्यार्थीनी आहे. गेल्या आठवड्यात माझ्यासोबत घडलेल्या एका अपघातानं पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबद्दलच्या माझ्या संकल्पनांना धक्का बसला. तो प्रसंग मला इथं मांडायचायः मी विश्रांतवाडी-विमानतळ रोडवरून माझ्या बाईकवरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरूणांनी धडक दिली. मला काही इजा झाली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले. ट्रॅफिक पोलिसांनी मला तत्काळ मदत केली आणि जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार... आणखी वाचा
प्रदीप जाधव
नोंव्हेबर 8 रोजी होणारी अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना दर्शविण्यात आलेल्या नापसंतीची टक्केवारी 61% आहे; तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या नापसंतीची टक्केवारी 52% आहे. निवडणूक इतक्‍या जवळ आली असताना दोघाही उमेदवारांच्या नापसंतीची एवढी उच्च टक्केवारी ही ऐतिहासिक टक्केवारी म्हनावी लागेल. याचा अर्थ बरेच नागरिक अजूनही कोणाला निवडून द्यावे... आणखी वाचा
व्यंकटेश कल्याणकर
स्पर्श : 'माणूस महत्त्वाचा की गुरे?'
डोंगरकपारीत जंगलाच्या जवळ एक वाडी होती. त्या वाडीमध्ये त्यांचा मोठा वाडा होता. त्यांचं घराणं प्रतिष्ठित होतं. जंगलाच्या अलिकडे त्यांची 100 एकरपेक्षा जास्त जमीन होती. वाड्यात नोकरचाकर होते. दूध, तूप, लोण्यांसाठी आणि शेतकामासाठी गायी, बैल, म्हशी, गुरे होती. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र नोकरमाणूस नेमलेला होता. घरात एक ज्येष्ठ गृहस्थ होते. या साऱ्या संपत्तीचे ते जणू काही सम्राट होते. त्यामुळे सारे त्यांना मालक म्हणून हाक... आणखी वाचा
सुधीर काळे
Narendra Modi and Nawaz Sharif
Responding to a dangerous time हा समयोचित खास लेख इनामुल हक, रियाज हुसेन खोखर, रियाज महंमद खान (तीघेही पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव) व मे.ज. (सेवानिवृत्त) महमूद दुराणी (पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) यांनी लिहिलेला असून त्याचा मराठी अनुवाद मी ’डॉन’ या प्रख्यात पाकिस्तानी वृत्तपत्राच्या अनुमतीने प्रकाशित करत आहे.  आता या लेखाचा मी केलेला अनुवाद - यातील “आपण अमुक-अमुक केले पाहिजे” अशा... आणखी वाचा
समृद्धी धायगुडे
तुम्हाला माहिती आहे 'इमोजी'बद्दल काही?
स्मार्ट फोनच्या युगात मजकूर पाठविण्यापेक्षा चित्रमय संभाषणालाच अधिक महत्त्व आहे. चॅट करत असताना आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या मनात उमटलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. मात्र वेगाने चॅट करत असताना मनातील नेमक्‍या भावना शब्दांत टिपणे प्रत्येकवेळी शक्‍य होईल किंवा नेमक्‍या भावना व्यक्त होतील असे नाही. या सर्वांवर मात करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील भाव किंवा मनातील भावना प्रभावीपणे... आणखी वाचा
सविता
लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्याची विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. देशाच्या राजकीय व्यवस्थेच्या सुधारणेसाठी हा चांगला निर्णय होऊ शकतो. परंतु, तो प्रत्यक्षात आणणे हे ही एक दिव्यच आहे.    लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्यास आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही... आणखी वाचा
अजय बुवा
काल शिवाजीनगरला वाहतुक पोलिसांची व्हिडीओ शुटींग करून त्यांच्याशी काही टवाळखोर हुज्जत घालत होते. त्यातच आज सकाळी मुंबईच्या वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे निधन झाल्याची बातमी येऊन धडकली. तर रात्री नऊ वाजता पुण्यातील एका पेठेत दुकानदार व महिलेची भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचीच कॉलर पकडून त्याच्यावरच गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या वर्दीला हात घालण्याबरोबरच थेट त्यांचा जीव घेण्याची माजुरडी... आणखी वाचा
वृत्तसंस्था
कोलकता - धर्मांतराला विरोध असेल, तर संसदेत धर्मांतराविरुद्ध कायदा आणावा. हे आमचे हिंदुराष्ट्र असल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे सांगितले. कोलकाता येथे हिंदू संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी ‘घरवापसी‘चा म्हणजेच इतर धर्मीयांच्या हिंदू धर्मात प्रवेशाचा मुद्दा अधोरेखित केला. धर्मांतरबंदीच्या विधेयकाला पाठिंबा द्या, असे आव्हानही भागवत यांनी या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना दिले.... आणखी वाचा
गोपाळ हरणे
गेल्या काही दिवसांत ‘गोहत्या‘ या मुद्द्यावरून काही हिंसक घटना घडल्या आहेत. कुठे गोहत्येच्या संशयावरून दलितांना मारण्यात आले, कुठे अदिवासींना मारहाण झाली तर कुठे मुस्लिम महिलांना गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारझोड करण्यात आली. या घटनांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. उशीरा का होइना पण पंतप्रधानांनी केलेल्या निषेधाचेही मी स्वागतच करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ही गोरक्षक मंडळी हिंदुत्ववादी आहेत आणि... आणखी वाचा
SPM
केवळ 10 ते 15 मिनिटांच्या या भेटीसाठी किंवा मुलाखतीसाठी पालकांना अख्खा दिवस सुट्टी काढावी लागते. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना वारंवार अशा पद्धतीची सुट्टी मिळेलच असे नाही. सध्याच्या काळात मुलांना शाळेत प्रवेश मिळणे म्हणजे एक दिव्यच काम झाले आहे. विविध शाळांच्या विविध मागण्या आणि नियम. कुणी डिसेंबर, जानेवारीत प्रवेश प्रक्रिया सुरू करतात तर कुणी जूनपासून सुरू करतात. अनेक ठिकाणी आता ऑनलाइन... आणखी वाचा
व्यंकटेश कल्याणकर
"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं त्यांना भान नसतं‘, तो प्रचंड त्रागा करत हॉस्टेलच्या खोलीत पोचला. हॉस्टेलच्या खोलीत चार जण होते. "आयला, आधी काय झालं ते तरी सांग की राव...‘ एकाने विचारले. "अरे, नेहमीप्रमाणे एक पोरगी आलती बघायला. डायरेक्‍ट विचारती राव लग्नानंतर "डस्टबिन‘ कोठे ठेवणार?‘ त्याने स्पष्ट केले. "साधी गोष्ट हाय राव. एवढं ओरडायला काय झालं मग.. "डस्टबिन‘ कोठे ठेवतात... आणखी वाचा
अनंत बागाईतकर
केवळ 10 ते 15 मिनिटांच्या या भेटीसाठी किंवा मुलाखतीसाठी पालकांना अख्खा दिवस सुट्टी काढावी लागते. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना वारंवार अशा पद्धतीची सुट्टी मिळेलच असे नाही.  सध्याच्या काळात मुलांना शाळेत प्रवेश मिळणे म्हणजे एक दिव्यच काम झाले आहे. विविध शाळांच्या विविध मागण्या आणि नियम. कुणी डिसेंबर, जानेवारीत प्रवेश प्रक्रिया सुरू करतात तर कुणी जूनपासून सुरू करतात. अनेक ठिकाणी आता... आणखी वाचा
गोपाळ हरणे
नवी दिल्ली - द्रमुकच्या खासदारांना श्रीमुखात लगावणाऱ्या अण्णा द्रमुकच्या खासदार शशिकला पुष्पा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.   अण्णा द्रमुकच्या प्रमुख आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी शशिकला पुष्पा यांनी हे कृत्य करून पक्षाची छवी खराब केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात येत आहे. दरम्यान शशिकला यांनी माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यावर पदाचा राजीनामा देण्याची बळजबरी करण्यात येत... आणखी वाचा
SPM
बांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची भूमिका असली; तरी या देशाचा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्धच्या दिशेकडील प्रवास हा कितीतरी आधीच सुरु झाला आहे. आता त्याची अभिव्यक्‍ती अधिक प्रखरपणे दिसून येते आहे, इतकेच म्हणता येईल.  बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामधील प्रसिद्ध "होली आर्टिसन कॅफे‘वर काही दिवसांपूर्वीच घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत 20 नागरिकांना ठार... आणखी वाचा