किरकटवाडीत कचरा फेकणाऱ्यांना पकडले 

garbage-4.jpg
garbage-4.jpg

पुणे ः सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा ते नांदेड फाटा या रस्त्यावर चालू गाडीवरून कचरा फेकणाऱ्यांना किरकटवाडी डेव्हलपमेंट फोरमच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले व फेकलेला कचरा उचलण्यास भाग पाडले. 
किरकटवाडी, खडकवासला या दोन्ही ग्रामपंचायतीच्या घंटागाड्या गल्लोगल्ली फिरून कचरा गोळा करतात. काही आळशी नागरिक घंटागाडी आली तरी कचरा टाकायला जात नाहीत. कामावर जाण्यासाठी हे नागरिक घराबाहेर पडतात, तेव्हा सोबत कचऱ्याची पिशवी घेऊन निघतात. चालू गाडीवरून किंवा रिक्षातून कचरा रस्त्याच्या कडेला फेकतात. यामुळे सिंहगड रस्त्याचा हा भाग अतिशय गलिच्छ व दुर्गंध पसरवणारा बनला आहे. 
सकाळच्या वेळी कचरा टाकला जात असल्याने किरकटवाडीचे तरुण जल अकादमीच्या गेटजवळ पाहारा देत थांबले होते. कचरा फेकणाऱ्याला थांबवून त्याला तो पुन्हा उचलण्यास या तरुणांनी भाग पाडले. त्यांना समजही देण्यात आला. किरकटवाडीचे उपसरपंच नरेंद्र हगवणे व माजी उपसरपंच सागर हगवणे यांनी सांगितले, की यापुढे कचरा फेकणाऱ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाईल. सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सरळसरळ हरताळ फासण्याचा प्रताप नागरिक करत आहेत. नागरिकांनी आता दक्ष राहून अशा कचरा टाकणाऱ्या लोकांना अद्दल घडवणे आवश्‍यक आहे, असे आवाहन किरकटवाडी डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी रोशन हगवणे, रोहन हगवणे, संदीप हगवणे, सुयश हगवणे, तेजस हगवणे कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com