ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा 

सकाळ संवाद
Wednesday, 22 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा 
पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल, कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, नाना वाडा, विश्रामबाग वाडा, मंडई अशा ऐतिहासिक वास्तू 
पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात; परंतु या ऐतिहासिक वास्तूंच्या चारही बाजूंना जाहिरातींचे फलक लावलेले असतात. यामुळे या 
ऐतिहासिक वास्तू पाहाव्या की जाहिरातींचे फलक. येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकांचे लक्ष विचलित झाल्यामुळे अपंगत्व, अपघात, जीवितहानीसारख्या प्रकारात वाढ होत आहे. याला पूर्णपणे लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार आहेत. अशा शहराला स्मार्ट सिटीचे शहर म्हणावे का.? यावर आता न्यायालयातच धाव घ्यावी लागेल तेव्हाच न्याय मिळेल, तेव्हाच अशा गोष्टींवर अंकुश बसेल. 
- अनिल अगावणे 

Image may contain: one or more people, sky and outdoor

 

वंदेमातरम्‌ संघटनेतर्फे शिलाई मशिन वाटप 
कात्रज : कात्रजमधील वंदेमातरम्‌ संघटना व अमित पुंगलिया यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोरोशी गावातील चाफेवाडीमध्ये 
आदिवासी महिलांना 4 शिलाई मशिन भेट म्हणून दिल्या. शिवणकाम करून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, कापडी पिशव्या शहरी भागात विक्री करता येईल. कोणावरही अवलंबून न राहता त्यातून त्यांना चार पैसे कमवता येईल, या हेतूने या मशिन देण्यात आल्या. शहराध्यक्ष प्रशांत नरवडे व अमित पुंगलिया यांच्या स्वनिधीतून मशिन वाटप करण्यात आले. या वेळी किशोर पुंगलीया, कल्याण आदिवासी आश्रम संस्थेचे आबा इंदोरे व पोलिस पाटील नांगरे, विशाल भुरुक उपस्थित होते. 
- प्रदीप नरवडे 

 

 

मुंढवा : मुंढव्यातील दशक्रिया घाटावर कचरा टाकण्यास मनाई असतानाही रात्रीच्यावेळी मोठा प्रमाणात कचरा टाकला जात आहे. संबंधित प्रशासनाने यावर कारवाई करावी. 
- प्रसाद गायकवाड 
 

 

"पीएमपी' बस बंद पडणे जीवनाचा एक भाग 
पुणे : "पीएमपी'च्या ताफ्यातील बस वारंवार बंद पडत आहेत आणि त्या टाटा मोटार्सनी पुरवलेल्या आहेत हे वाचून आश्‍चर्य वाटले. टाटा कंपनी आपल्या 
मालाच्या उत्कृष्टतेबाबत अतिशय चोख असते, असा ग्राहकांचा विश्वास त्यांनी कमावलेला आहे. असे असताना त्यांनी "पीएमपी'ला पुरवलेल्या बस वारंवार बंद 
पडाव्या, ही गोष्ट काही वेगळीच शंका मनात निर्माण करते. ती म्हणजे आपल्या सार्वजनिक संस्थांसाठी वापरावी लागणारी निविदा पद्धती, तिच्यातील सर्वांत स्वस्त निविदा 
स्वीकारण्याची सक्ती आणि अर्थातच पुरवठादाराला निविदा जिंकण्यासाठी करावी लागणारी सगळी कसरत. मग पीएमपी बस वारंवार बंद पडणे पुण्याच्या नागरिकांनी जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारणे भाग आहे. 
- स. सी. आपटे 
 

 

"एनडीए'ने मुक्‍या जनावरांना परवानगी द्यावी 
कुडजे : कुडजे गावातील डोंगरभागामध्ये एनडीए प्रशासनाने संरक्षण भिंत बांधल्यामुळे गावातील जनावरांचे खूप हाल झाले आहेत. बऱ्याच लोकांनी आपली जनावरे विकून 
टाकली आहेत. पूर्वीच्या काळी कुडजे गावातून दररोज 400 ते 500 लिटर दूध शहरामध्ये विक्रीसाठी जात होते. आता खूप कमी लोकांचे व्यवसाय चालू आहेत.         बऱ्याच लोकांना शहरातून दूध पिशवी विकत आणावी लागते. कारण चारा नसल्यामुळे लोकांनी आपल्या गाई, म्हशी विकून टाकल्या आहेत. गावाशेजारील डोंगरात खूप गवत 
असते; पण दरवर्षी ते गवत जंगलात आग लागल्यावर जळून जाते; परंतु जनावरांचा गवतावर हक्क असून ते त्यांना खायला मिळत नाही, याचे खूप दुःख वाटते. एनडीएची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे, हे मला माहीत आहे; पण फक्त मुक्‍या जनावरांना त्यांच्या हक्काचा चारा मिळावा. 
- दत्ता पायगुडे 

 

शिवण्यात सांडपाण्याचा आरोग्यास धोका 
शिवणे : शिवणे एनडीए रस्त्यावरील एसएएम कंपनीसमोर पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. 
- महालक्ष जोशी 

 

शास्त्रीनगर मशिद रस्ता अंधारमय 
कोथरूड : कोथरूडमधील शास्त्रीनगर मशिद रस्त्यावर अत्यंत कमी विजेचा प्रकाश पडतो. हा रस्ता साईनाथ वसाहतीकडे जात आहे. या रस्त्यावर रात्री सातनंतर अंधारच असतो. यामुळे या मार्गावरून जाताना महिला, लहान मुले, ज्येष्ठांना भीती वाटते. याची दखल संबंधित कोथरूड क्षेत्रीय कार्यालयातील विभागाने घ्यावी व लवकरात लवकरत कार्यवाही करावी. 
-प्रा. डी. डी. तांबे 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advertisements on historical buildings