#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
सिंहगड रस्त्यावर पदपथावरच फलक
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावर स्मार्ट सिटीअंतर्गत बनवलेल्या पदपथावर स्मार्ट पक्षाचे अनधिकृत फलक लावलेले आहेत. तसेच काही लोक गाड्यादेखील लावतात. त्यामुळे खरंच याचा उपयोग लोकांना चालणे, सायकल ट्रॅकसाठी होत नाही. शिवाय सायकलस्वाराचा रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते त्वरित
हटविणे गरजेचे आहे. तसेच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.
-विजय मते
"अभिरुची'च्या मागील उद्यानात
ओपन जिमची व्यवस्था असावी
सिंहगड रस्ता ः अभिरुची मॉलच्या मागे एका प्रस्तावित बागेचे काम सुरू आहे. त्यातील चालण्याच्या पट्ट्याचा अनेक नागरिक वापर करत आहेत. सध्या अजून काही भागात नवीन काम सुरू होत आहेत. आशा करतो की त्यात ओपन जिमची व्यवस्था अंतर्भुत केली आहे. अनवधानाने जर राहून गेले असेल तर प्रशासनाने
त्याचा सामावेश करावा; जेणे करून त्या परिसरातील लोकांना त्याचा फायदा होईल.
- नागेश वैद्य
बेशिस्त पार्किंगमुळे "सनसिटी'त कोंडी
सिंहगड रस्ता : सनसिटी रस्त्यावर आधीच वाहनांची गर्दी असते. त्यात भाजीवाले, पानटपरी असतेच. वारंवार सांगूनही तेथील गॅरेजवाला निम्या रस्त्यापर्यंत गाड्या लावत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनी जायचे कसे? नगरसेवकांनी त्यांना योग्य ती समज द्यावी.
- अर्चना रानडे
नवोदय सेवा फाउंडेशनतर्फे साहित्य वाटप
कोथरूड : नवोदय सेवा फाउंडेशनतर्फे कळमशेत (ता. मुळशी) येथे जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी मुलांना संपूर्ण शालेय गणवेश व खाऊवाटप करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रम उमाकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक बागूल, सहायक शिक्षक राठोड व रानडे, मनसेचे मुळशी तालुका उपाध्यक्ष, स्थानिक ग्रामस्थ, इतर कर्मचारी वृंद व संस्थेचे सर्व सभासद आदी उपस्थित होते.
- शुभम जगदाळे