#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
कृषी महाविद्यालय रस्त्याची चाळण
शिवाजीनगर : कृषी महाविद्यालय पुणे येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे कॉलेजच्या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य आहे. कृषिदूत आणि कृषिकन्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी, ही विनंती.
-करणकुमार पोले
महावितरण बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत
ऋतुजा तारे यांना सुवर्ण पदक
वडगाव शेरी : कुस्ती, कबड्डी, धावणे या मैदानी खेळांबरोबरच बुद्धिबळाच्या मैदानातही महिलांनी बाजी मारून स्वतंत्र ठसा उमटविला आहे. महावितरणच्या आंतरस्तरीय क्रीडा स्पर्धांचा श्रीगणेशा 2017 ला झाला. त्या वर्षापासून बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी ऋतुजा दुर्गेश तारे यांनी सुवर्ण पदक मिळविण्याचा बहुमान पटकावला. या वर्षी नागपूर येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत, प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, नागपूर परिक्षेत्र; तसेच सचिन तालेवार, मुख्य अभियंता संजय ढोके आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. ऋतुजा या सध्या वडगाव शेरी उपविभाग येथे कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत असून, त्यांना संगीतातही उत्तम गती आहे.
-एकनाथ लंघे
पेरीविंकल सोसायटीसमोर
पाण्याची वाहिनी फुटली
खराडी : जुन्या मुंढवा-खराडी रस्त्यावरील पेरीविंकल सोसायटीसमोर पाण्याची वाहिनी फुटली आहे. मागील पाच दिवसांपासून पाणी वाहत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे लक्ष नाही. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य; तर दुसरीकडे पाण्याची नासाडी होत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.
-खंडुजी