तुम्ही वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहात का? मांडा तुमच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 December 2018

तुमच्या प्रभागातील, तुमच्या रोजच्या मार्गातील वाहतूकीची स्थिती, वाहतूक कोंडी, वाहतूक समस्या आमच्या पर्यंत पोहचवा. #PuneTraffic या हॅशटॅगचा वापर करुन तुम्ही आम्हाला ही माहिती पाठवू शकता. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. तसेच @esakalupdate या ट्विटर हँडलवर, webeditor@esakal.com या ईमेल आयडीवर अथवा 9130088459 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता.

पुणे आणि वाहतूक कोंडी हे समीकरण आता पुणेकरांसाठी नित्याचेच झाले आहे. घरातून बाहेर पडले की प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी दिसतेच. पुणेकरांचा रोज दोन-तीन तास तर सहज वाहतूक कोंडीतच जातात. कुठे रहदारी जास्त तर, कुठे अडथळे जास्त. कुठे मेर्टोसाठी खड्डा खणलेला असतो तर, कुठे केबल टाकण्यासाठी. या सर्वातून वाट काढत या वाहतूक कोंडीतून बाहेर पडणे म्हणजे अत्यंत अवघड काम. पण, हे काम प्रत्येक पुणेकर दररोज न चुकता नेटाने पार पाडतो. पण कित्येकादा प्रशासनाच्या दुर्लक्षित आणि निष्काळजी कामकाजामुळे नागरिकांची गैरसोय होत असते.

कधी वाहतूक नियंत्रक दिवेच नसतात, तर कधी असूनही बंद असतात. कधी गतिरोधकच नसतात, तर कधी अशास्त्रीय गतिरोधक असतात. कधी दुभाजकच नसतात, तर कधी दुभाजक असूनही त्याची दुरवस्था झालेली असते. कधी पार्किंगसाठी उपलब्ध नसते, तर कुठे 'नो पार्किंग' मध्येच वाहने लावली जातात.....अशा कित्येक कारणांमुळे निर्माण झालेल्या वाहतूकीच्या समस्या तुम्ही रोज अनुभवत असाल.

तुमच्या भागातील वाहतूकीच्या समस्यांचे कारण काय? या वाहतूकीच्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही काय करता?  या समस्या तुम्ही प्रशासना पर्यंत पोहचवता का ? प्रशासनामार्फत या समस्यांची दखल घेतील का? या समस्यांवर काय उपाययोजना करता येईल? ते आम्हाला कळवा. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी धरपडणाऱ्या पुणेकरांचा/ नागरिकांचा आवाज प्रशासन आणि वाहतूक पोलिसांपर्यंत पोहचविण्यासाठी 'सकाळ'चे व्यासपीठ नेहमीच उपलब्ध आहे.

तुमच्या प्रभागातील, तुमच्या रोजच्या मार्गातील वाहतूकीची स्थिती, वाहतूक कोंडी, वाहतूक समस्या आमच्या पर्यंत पोहचवा. #PuneTraffic या हॅशटॅगचा वापर करुन तुम्ही आम्हाला ही माहिती पाठवू शकता. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. तसेच @esakalupdate या ट्विटर हँडलवर, webeditor@esakal.com या ईमेल आयडीवर अथवा 9130088459 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are you stuck in traffic jams? Give your feedback