पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी 

सकाळ संवाद
Wednesday, 18 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी 

कुडजे : खडकवासला जवळील आमच्या कुडजे गावात खूप पशुपक्षी राहतात. बदलत्या काळानुसार बऱ्याच लोकांनी सिमेंटची घरे बांधली आहेत. सिमेंटच्या भिंतीत चिमण्यांना घर बांधता येत नाही. त्यामुळे त्यांना राहायला घरटी कमी पडतात. बऱ्याच चिमण्या रात्रीच्या वेळी आमच्या घरामागील झाडावर बसतात. 
त्यासाठी त्यांना राहण्यासाठी आमच्या घराला छोटी छोटी लाकडाची घरटी बसवली आहेत. लवकरच गावामध्येसुद्धा अशी कृत्रीम घरटी बसविण्याचा मानस आहे. 
- दत्ता पायगुडे 

समर्थ पथावर अतिक्रमण 
समर्थ पथ : अलंकार पोलिस चौकी ते प्रतिज्ञा मंगल कार्यालय रस्ता येथे सारस्वत बॅंके समोरील पदपथावर अतिक्रमण करून दुकाने थाटलेली आहेत. यामुळे पदपथावरून चालणे अवघड झाले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिक खरेदी करीत असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. तसेच या रस्त्यावर पी 1, पी 2 पार्किंग रचना असल्याने पार्किंगची जागा जाते. हे आक्रमण जुने असून, प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे काणाडोळा करीत आहेत. 
- किरण गांधी 

Image may contain: one or more people, tree, sky, shoes, plant, outdoor and nature

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial nest for birds