बागुल उद्यानाची दुरवस्था 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पर्वती : शिवदर्शन येथील बागुल उद्यानाकडे उद्यान विभागाचे पुर्ण दुर्लक्ष झाले आहे. वेडीवाकडी वाढलेली जंगली झाडे, तोडलेले लाईट, रात्री चालणाऱ्या दारू पार्टीचे पडलेल्या बाटल्या, ग्लास यामुळे बागेची शोभा गेली आहे. येथे नियमित फिरायला, व्यायाम करायला येणाऱ्या नागरिकांना याची लाज वाटते. येथील झाडांची निगा राखणे हे कर्तव्य असताना यथे वर्षांनुवर्ष "माळी काम" करणाऱ्या सेवकांना काहीही सांगण्याची सोय राहिलेली नाही. येथील महिला वॉचमन दिखाऊ आहेत. कुत्री फिरवायला बंदी असताना येथील रखवालदाराने कुत्रे पाळलेले आहे. तसेच बाहेरच्या भटक्या कुत्र्यांचा देखील त्रास होत आहे. बागेत खाद्य पदार्थ नेण्यास बंदी असतानाही सर्वत्र त्याचा कचरा पडलेला असतो. निरूपयोगी रबराची झाडे वेडीवाकडी वाढून आजूबाजूला कचरा पडत असतो. नगरसेवका देखील याकडे दुलर्क्ष केले आहे.  महापालिका प्रशासनाला जाग येईल का?

Web Title: bad condition of bagul gardan