पीएमपीचा भोंगळ कारभार 

सकाळ संवाद
Tuesday, 10 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पीएमपीचा भोंगळ कारभार 
स्वारगेट : स्वारगेट ते पानशेत पीएमपीची 52 नंबरची बस ग्रामस्थांच्या आग्रहाखातर सुरू करण्यात आली. त्यानिमित्त प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद घेऊन पीएमपीच्या नवीन ताफ्यात आलेली सीएमजी बस धावली. परंतु, दुसऱ्याच दिवशी स्वारगेट आगरातून जुन्या ताफ्यातील नादुरुस्त असलेल्या बस या भागात पालविण्यात आली. लांबच्या पल्यासाठी आगारातील असलेल्या संबंधित अधिकाऱ्याने हलगर्जीपणाने पाठवली. त्यामुळे 2 तासाचा असणारा हा प्रवास चांगलाच 2. 30 ते 3 तासाचा झाला. त्यामुळे ही बस चालवत असताना चालकाला कसरत करून चालवावी लागली. त्यामध्ये खडकवासला एनडीए येथे ही बस आली असता बसचा पुढील हेडलाइट व एडीएटरचा कव्हर पूर्ण निघून खाली पडला. नाईलाजाने वाहक चालक व काही प्रवाशांनी अक्षरशः आजूबाजूला 10 मिनिटे घालवून दोरी शोधली व ते सर्व निघालेले भाग पुन्हा बांधून ही बस कशीबशी पानशेत पर्यंत आणली. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन सुस्थितीत असलेली वाहने या मार्गावर मार्गस्थ करावीत ही विनंती. जेणेकरून प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन त्यांची हेळसांड होणार नाही. 
-गौरव देशमुख 

Image may contain: sky, cloud, tree, outdoor and nature

कात्रज : कात्रज- आंबेगाव रोड येथे पादचाऱ्यांसाठी पदपथ नाही. कित्येक दिवसांपासून अंबरगावच्या गायमुखजवळ स्क्रॅप स्थितीत ट्रॅक्‍टर उभा आहे. त्यामुळे पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मॉर्निंग वॉकसाठी मोठा अडथळा आहे. 
-गणपत खवारे 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In bad condition of PMP bus