फ्री लेफ्टसाठी अडथळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पिंपरी : पीसीएमसीमध्ये टेल्को रस्त्यावर यशवंत नगर चौकातील 'फ्री लेफ्ट' म्हणजे 'डावीकडील रस्ता वळण्यासाठी मुक्त आहे' असे फलक लावले आहेत. या ठिकाणी बहुतेकदा काही वाहनचालकांना थेट सरळ जायचे असले तरी ज्यांना डावीकडील मुक्त रस्त्यावरुन वळायचे असते त्यांना अडथळा निर्माण करतात. त्यामुळे डावीकडील मुक्त रस्त्यावर वळायचे आहे त्या वाहनांना विनाकारण हिरवा सिग्नल चालु होण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अशा लोकांना समजावे आणि अडथळा होऊ नये म्हणुन अशा जागी खांब असणे आवश्यक आहे. जेणेकरून जो डावीकडील मुक्त रस्त्याच्या लेनमध्ये प्रवेश केल्यावर फक्त डावीकडे जाता आले पाहीजे. नंतर सरळ जाता येणार नाही. कृपया महापालिकेने याची दखल घ्यावी

Web Title: Barrier for free left