ग्रामीण भागातील चांगल्या व वेळेवर बस पाठवत जा, यासाठी फोनद्वारे विकी मानकर यांनी लगेच कोथरूड डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता. मी आता बाहेर आहे, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांनी माहिती सांगतो, अशी अनेक उडवाउडवीची उत्तरे दिली.
सांगरुण : डेक्कन ते सांगरुण ही बस (क्र 84 ) डेक्कनहून 2.35 मिनिटांनी सुटते; पण काही कारणास्तव मंगळवारी (ता. 17) बस सोडली नाही. नंतर 3.20 मिनिटांनी बहुली बस डेक्कनहून सांगरुण मार्गासाठी पाठवण्यात आली. प्रवाशी ताटकळत तास-दीड तास बसथांब्यावर उन्हात उभे राहतात; पण अत्यंत खराब परिस्थितील बस दोन तासांनी मार्गावर पाठवून लोकांकडून तिकीटांचे पैसे घेऊन बस कमळादेवी मंदिर घाटात बंद पडली. प्रवाशांनी चालक-वाहकाला दुसरी बस बोलवून घ्या, असे सांगितले, असता आता दोन तासांनी बस आहे. त्या बसने तुम्ही जावा, असे सांगितले.
ग्रामीण भागातील चांगल्या व वेळेवर बस पाठवत जा, यासाठी फोनद्वारे विकी मानकर यांनी लगेच कोथरूड डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता. मी आता बाहेर आहे, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांनी माहिती सांगतो, अशी अनेक उडवाउडवीची उत्तरे दिली.
मार्केट यार्डवरून सांगरुणला राहुल मानकर यांचा मालवाहतूक टेंपो आला असता त्याला थांबवून गाडीतील माल एका बाजूला करून कुडजे, मांडवी, सांगरुण, बहुली परिसरातील 40-50 प्रवाशांना टेंपोतून प्रत्येक गावागावात सोडण्यात आले. पीएमपी प्रशासन वारंवार ग्रामीण भागात नादुरुस्त बस पाठवते. भागातील नागरिकांना आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पीएमपीकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणताही प्रशासकीय अधिकारी याकडे लक्ष देत नाही.