पर्यावरण दिनीच प्रचंड प्रमाणात कचरा जाळला 

अमरेंद्र
बुधवार, 6 जून 2018

पुणे : सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावात पांडुरंग औद्योगिक वसाहतमध्ये पर्यावरण दिनीच प्रचंड प्रमाणात कचरा जाळण्यात आला. सदर जागेमध्ये पूर्वी प्लॅस्टिक वर्गीकरण केले जात होते, त्यामुळे प्लॅस्टिक बरोबर इतर कचराही टाकला जात असे. तेव्हा सुध्दा अनेकदा इतर कचरा व प्लास्टिक जाळले जात असे.

सुदैवाने आता ही जागा रिकामी आहे. परंतु तिथे असलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी तो जाळण्याची पद्धत अवलंबली गेली व पूर्ण परिसर विषारी धोकादायक धुराने भरून गेला. दुपारी 1 ते मध्यरात्रीपर्यंत कचरा जळत राहिला.  प्रशासनाला आणि लोकांना पर्यावरण रक्षणाचे महत्व कळणार तरी कधी? 

Web Title: burning of waste in huge amount on environment