झाडांभोवती सिमेंटचा विळखा 

सकाळ संवाद
Thursday, 19 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

झाडांभोवती सिमेंटचा विळखा 
कोथरूड : कर्वे रस्त्यावर महर्षी कर्वे पुतळा चौक ते पौड फाटा चौक या दरम्यान पदपथाचे नूतनीकरण करून पदपथ मोठा केला आहे. नूतनीकरण करताना पादचारी मार्ग व सायकल ट्रॅक तयार केला आहे. महापालिकेने येथे पावसाळ्यात वृक्षारोपण केले होते. त्यांपैकी पन्नास टक्के झाडे जगली आहेत. पदपथाचे नूतनीकरण करताना या झाडांभोवती पाणी जिरण्यासाठी मोठे आळे ठेवणे आवश्‍यक असताना ते न ठेवता झाडांच्या बुंध्यावर कॉंक्रीट व ब्लॉक बसविले आहेत. त्यामुळे झाडांच्या मुळाशी पाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. अशा पद्धतीने झाडे जगणार कशी? 
- शिवाजी पठारे 

Image may contain: plant and outdoor

कर्वे नगर :  डीपी रस्त्यावर ज्ञानदा प्रतिष्ठानजवळ नवीन पदपथ फ्लेक्‍स उभा करण्यासाठी खोदला आहे. तरुण मंडळे उत्साहाच्या भरात सण, जयंती साजरी करण्यासाठी असे कृत्य करतात. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि दंडात्मक कारवाई करावी. 
- सचिन जाधव 

Image may contain: outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cement around the tree