चॉंदतारा चौकातील चेंबर,  खड्डे दुरुस्त करावेत 

सकाळ संवाद
Friday, 21 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

चॉंदतारा चौकातील चेंबर, 
खड्डे दुरुस्त करावेत 

घोरपडे पेठ : मोमीनपुरा येथील चॉंदतारा चौकातील चेंबरची झाकणे खचली आहेत. तसेच त्याच्याभोवती खड्डे पडले असून, वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर चेंबरचे झाकण व खड्डे भरून डांबरीकरण करावे. 
-विजय जगताप 
 
कर्वे शाळेशेजारी दूषित पाणी रस्त्यावर 
कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये काकडेसिटीयेथील महर्षी कर्वे शाळेशेजारी ड्रेनेजचे दूषित पाणी नाल्यात व रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आठ दिवस झाले तरी उपाय योजना केलेली नाही. 
-किशोर जैनक 

Image may contain: outdoor

नऱ्हे आंबेगाव : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेजवळ एक मोठा खड्डा आहे. या खड्ड्याजवळ कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्‍टर, बॅरिकेड किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाही. शेकडो शालेय विद्यार्थी आणि स्कूल व्हॅन येथून ये जा करीत असतात. त्यामुळे येथे अपघात घडण्याची शक्‍यता आहे. 
-सचिन जाधव 

मुंढवा दशक्रिया घाट परिसरात 
उपाययोजनांची आवश्‍यकता 

मुंढवा : मुंढवा दशक्रिया घाट परिसरात नियमित कचरा टाकण्यात येतो. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व मुकादमाकडे वारंवार तक्रार करूनही काहीच कार्यवाही होत नाही, तसेच नदीकाठी असणारी ड्रेनेजलाइन फुटलेली आहे. त्यातून मैलायुक्त पाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी मोकाट जनावरांच्या वावरामुळे नागरिक हैराण झाले आहे. लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात. 
- प्रसाद गायकवाड 

Image may contain: outdoor, water and nature

महात्मा फुले रस्त्यावर 
फुटपाथ करावेत 

लोकमान्यनगरमधील महात्मा फुले रस्त्याचे डांबरीकरण नुकतंच सुरू झाले आहे. या रस्त्याच्या बाजूला प्राथमिक शाळा आहे. दोन्ही बाजूंनी वाहतूक, पार्किंग यामुळे मुलांना घेऊन शाळेत जाणे खूपच त्रासदायक झाले आहे. रस्त्याच्या एका बाजूला फुटपाथ करणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक विभागाने एकेरी वाहतूक करण्याचा विचार करावा. 
-प्रकाश इंगळे 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chambers, pits should be repaired in chandtara chauk