चला, बनू या सिटिझन जर्नालिस्ट...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

स्त्रियांबाबत मानसिकता बदलणे गरजेचे
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली पाहिजे,’ यांसारखे अनेक अभियान राबविले जातात. दूरचित्रवाणी, रेडिओ, वर्तमानपत्रांतून अनेक जाहिराती आपण पाहतो. मात्र, प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी आहे. देशातील स्त्रियांबद्दल आपण खरच जागरूक आहोत का? उन्नाव आणि कथुवा येथील अल्पवयीन मुलींबाबत घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत. या गुन्ह्यांतील आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. या प्रकरणाला समाजातील क्रूर मानसिकता कारणीभूत असून, ती बदलणे गरजेचे आहे. 
- मनीषा केदारी

स्त्रियांबाबत मानसिकता बदलणे गरजेचे
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली पाहिजे,’ यांसारखे अनेक अभियान राबविले जातात. दूरचित्रवाणी, रेडिओ, वर्तमानपत्रांतून अनेक जाहिराती आपण पाहतो. मात्र, प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी आहे. देशातील स्त्रियांबद्दल आपण खरच जागरूक आहोत का? उन्नाव आणि कथुवा येथील अल्पवयीन मुलींबाबत घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत. या गुन्ह्यांतील आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. या प्रकरणाला समाजातील क्रूर मानसिकता कारणीभूत असून, ती बदलणे गरजेचे आहे. 
- मनीषा केदारी

पर्यवरणाबाबत जनजागृती
विश्रांतवाडी येथील गंगाकुंज सोसायटीत आम्ही रहिवासी आहोत. आम्ही मुलाच्या वाढदिवसाला रोप भेट देऊन पर्यावरणपूरक उपक्रम साजरा केला. अनेकांकडून भेटवस्तू म्हणून दिलेल्या रोपाचे संगोपन केले जाणार आहे. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोचविला पाहिजे.  
-ऋतुजा आणि लक्ष्मण शिंदे

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिवादन
समाज सुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त क्वार्टर गेट येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ॲड. आनंद गवळी, मोहन वाडेकर, लता राजगुरू, आनंद भिसे, बाबा खंडागळे, विजय जगताप, बाळा खंडागळे आदी उपस्थित होते. 
- एक नागरिक 

दुभाजक बसविण्याची आवश्‍यकता
पूना हॉस्पिटल ते शास्त्री रस्ता सिग्नलदरम्यान रस्त्याच्या मधोमध दुभाजक नसल्याने वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे रात्रीच्या सुमारास अपघात होण्याची शक्‍यता आहे. या रस्त्यावर सिमेंटचे दुभाजक अथवा पांढरे पट्टे मारणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अपघात आणि वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. 
- हेमंत भालेराव

बीआरटी मार्गात खासगी वाहने
सातारा रस्त्यावरील स्वारगेट-कात्रजदरम्यानच्या बीआरटी मार्गात खासगी वाहने प्रवेश करत असल्याने पीएमपी बसला अडथळा निर्माण होत आहे. खासगी वाहनचालक बीआरटी मार्गाच्या सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षारक्षकांनाही जुमानत नाहीत. यामुळे बीआरटी मार्गातून जाणाऱ्या खासगी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी.
- दयानंद शिंदे-पाटील

पालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांची हेळसांड
महापालिका रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांची हेळसांड होते. आगामी काळात रुग्णांच्या सेवेसाठी महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे आवश्‍यक आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता ससून हॉस्पिटलच्या धर्तीवर अजून चार हॉस्पिटल उभारल्यास नागरिकांची गैरसोय कमी होईल.
-एक नागरिक

उस्मानाबादमध्ये गणिताचे गाव
उस्मानाबाद जिल्ह्यातील सुकटा हे खेडेगाव गणिताचे गाव म्हणून ओळखल जाते. गावातील ग्रामपंचायत, पाण्याच्या टाकी, घरांच्या भिंती, कमानी, शौचालयाच्या भिंतीवर गणितातील आकडेवारी, संज्ञा, सूत्रे, गणितीय चिन्हे, प्रमेय यांसारख्या अनेक गोष्टी रंगाने काढलेल्या आहेत. गावच्या शाळेतील गणिताचे शिक्षक प्रकाश यादगिरे यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम अनेक विद्यार्थी व नागरिकांना लाभदायक आहे.
- एक नागरिक

www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp: 9130088459 

Web Title: citizen journalist