चला, बनू या सिटिझन जर्नालिस्ट...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात
हडपसर येथील भेकराईनगरच्या पीएमपीएलच्या बस डेपोमध्ये प्रवाशांना प्राथमिक सोईसुविधा मिळत नाहीत. भेकराईनगर डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. डेपोमध्ये बसथांब्यांचा अभाव असल्याने प्रवाशी कुठेही उभे राहतात. यामुळे बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते. डेपोतील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाल्याने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. तसेच प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नसून महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. संबंधित विभागाने प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. 
- अरुण तोष्णीवाल

दुभाजकावर रिफ्लेक्‍टर हवेत
उत्तमनगर येथील सावेडीजवळील प्रोफेसर चौकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकाला रिफ्लेक्‍टर नसल्याने वाहने वेडीवाकडी चालविली जातात. याचा पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. रिफ्लेक्‍टर नसल्याने वाहने दुभाजकांवर आदळली आहेत. अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्‍टर बसविणे आवश्‍यक आहे. 
- एक नागरिक

घंटागाडी येत नसल्याने गैरसोय
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मौर्या नर्सिंग होमजवळ जलधारा सोसायटीत कचरा नेण्यासाठी चार- पाच दिवसांतून एकदा घंटागाडी येते. या वेळी अनेकदा स्वच्छ भारत ॲपद्वारे तक्रार केल्यानंतर आम्ही योग्य त्या सूचना दिल्याचा संदेश येतो. मात्र पुढे काहीच करवाई होत नाही. घंटागाडी येत नसल्याने परिसरातील अनेक रहिवासी रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात.
- अरुण नाईक

रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे 
कात्रज-कोंढवा मार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ठिकठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. कोंढवा-कात्रज रस्त्याने सासवड, फुरसुंगीला जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात असतात. या रस्त्यावर अनेकदा अपघात झाल्याने रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. 
- गणेश कांबळे

पदपथाचे काम अपूर्ण
हडपसर-मुंढवा रस्त्यावरील ॲमेनोरा चौकात पदपथाचे काम अपूर्ण असून, बांधकाम साहित्य आणि इतर राडारोडा टाकलेला आहे. यामुळे पदपथावरून चालताना पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने लवकरात-लवकर दखल घेऊन काम पूर्णत्वास नेणे आवश्‍यक आहे.
- एक नागरिक

रंगनाथन कर्णबधिर संस्थेला पुस्तके भेट
जागतिक पुस्तक दिनानिमित्त जिजाऊ ग्रंथालयाने टिंगरेनगर येथील रंगनाथन कर्णबधिर संस्थेला पुस्तके भेट दिली. या वेळी महापालिकेचे अधिकारी ज्ञानेश्‍वर मोळक, नूतन चिंचणे, कांचन जुन्नरकर आदी उपस्थित होते. 
- ॲड. शैलजा मोळक

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा
www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp - 9130088459 

Web Title: citizen journalist