पुणे महापालिकेतील पास केंद्रात नागरिकांची कुचंबणा 

- पंजाबराव देशमुख 
Wednesday, 21 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : मी ज्येष्ठ नागरिक आहे. पुणे महापालिका भवनामधील पीएमपी पास केंद्रात जुने ओळखपत्राच्या नूतनीकरणासाठी गेलो असता, तिथे दोन खिडक्‍यांतून काम सुरू होते. एक छोटा बाक बसायला उपलब्ध होता. त्यावर चार ज्येष्ठ नागरिक दाटीने बसले होते; तर खिडकीसमोर असलेल्या 7 बाय10च्या जागेत तीन रांगेत विद्यार्थी व नागरिक दाटीवाटीने उभे होते. तिथे पंखासुद्धा नव्हता. त्यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. साधी हवा येत नव्हती. त्यामुळे यापूर्वी बस शेडला लागून असलेले पास केंद्र बरे असे म्हणावे लागेल. कर्मचारी मात्र 10 बाय16 च्या जागेत पंख्याखाली आरामात काम करीत होते. खरे तर कर्मचाऱ्यांना 10 बाय 7 जागा बसायला पुरेशी होती. त्यामुळे नागरिकांना आतील खोलीत पंख्यासह मोकळा श्वास घेता आला असता. पालिकेने एवढी मोठी नवीन इमारत बांधली तरी सामान्य नागरिकांची कुचंबणा कायम आहे. नव्हे, मोठ्या प्रमाणावर वाढली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, हे प्रत्यक्ष अनुभवाने पटेल. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens' frustrate at the pass center in the pune municipal corporation