अविष्कृती नृत्य संस्थेचे  स्नेहसंमेलन उत्साहात 

सकाळ संवाद
Tuesday, 28 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

अविष्कृती नृत्य संस्थेचे 
स्नेहसंमेलन उत्साहात 

हडपसर : सदाशिवनगरमधील अविष्कृती नृत्य आणि गायन संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. 
अभिलाषा बेलुरे आणि अनुजा झाडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय संगीत गायिका अंबिका स्वामी आणि विद्यार्थिनी वर्षा वाघजी यांनी 
सादर केलेल्या "नमन नटवरा' या नांदीने झाली. कार्यक्रमात लहानग्यांनी विविध देशभक्तिपर गाण्यांवर नृत्य सादर केले. मुलांनी बंदिशी आणि राग भूप सादर केला. अनेकांनी गिटार, पियानो, ड्रमसेटच्या वादनाने दर्शकांची मने जिंकली. गार्गी चिड्डावार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. किशोर मद्रेवार यांनी आभार मानले. 
-वर्षा वाघजी 

 

Image may contain: 18 people, people standing, wedding and indoor

 

 

मगरपट्टा फ्लायओव्हरसमोरील 
भटक्‍या कुत्र्यांना आवरा 

हडपसर : सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा फ्लायओव्हरसमोरील नाल्याशेजारून वैभव टॉकीजच्यामागे जाणाऱ्या रस्त्यावर बेवारस कुत्री रस्त्यात ठाण मांडून बसलेली असतात. ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित कारवाई करावी. 
-बलवंत रानडे 
 

Image may contain: one or more people, tree, shoes, sky, outdoor and nature

 

साडेसतरानळी रस्त्यावरील झाडांचे 
वनक्षेत्रात पुनर्रोपण करावे 

हडपसर : साडेसतरानळी ते केशवनगर रस्त्यावर रेल्वे लाइननंतर असणारी झाडे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. अरुंद असणारा हा रस्ता जवळचा मार्ग म्हणून मोठ्या रहदारीचा झाला आहे. मात्र रुंदी कमी व मध्यावरच झाडे यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. ही झाडे शेजारच्या वनक्षेत्रात पुनर्रोपीत करावीत. 
-तानाजी सातव 

 

नारायणपूर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे 
वाहनचालकांसह भाविक त्रस्त 

हडपसर : सासवड ते नारायणपूर व नारायणपूर ते केतकावळे घाटापर्यंतचा रस्ता पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाच्या व दुरुस्तीच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. त्यामुळे वाहनचालकांना, स्थानिक गावातील नागरिकांना, पर्यटकांना धुळीचा व खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे श्वसनाचे, दमा, फुफ्फुस, हाडांचे विकार, मणक्‍याचे विकार, कंबरदुखी यांच्या त्रासाने वाहनचालक, गावकरी मंडळी त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस प्रतिबालाजी व प्रतिगाणगापूर एकमुखी दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात, याचे भान तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे. 
-अनिल बाळासाहेब अगावणे 

 

 

Image may contain: sky, tree, car, outdoor and nature

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dance Institute In an ecstasy of affection