कबुतरांना धान्य टाकल्यावर धोका

सकाळ संवाद
Wednesday, 4 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

बॅनर मुडपताच धान्य टाकण्यास सुरुवात 
कबुतरांमुळे श्वसनाचे रोग वाढतात. त्यात कोरोना व्हायरसही थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व काळजी म्हणून ओंकारेश्वर देवस्थानच्या वतीने कबुतरांना धान्य घालू नका म्हणून बॅनर लावण्यात आले होते. पण ते बॅनर थोडेसे मुडपताच नागरिकांनी धान्य टाकणे सुरू केले. अशाने रोगराई वाढेल. 
- सत्येंद्र राठी 

Image may contain: one or more people, sky, tree, basketball court, shoes and outdoor

आंबेगाव बुद्रुकमध्ये रस्त्याच्या 
कामामुळे नागरिकांची गैरसोय 

आंबेगाव बुद्रुक : येथे रोडमध्येच जेसीबी लावण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एकाच वेळेस सर्व कामे चालू केली आहेत व दिवसा काम करून कॉन्ट्रॅक्‍टर त्याची मशिनी रोड मध्येच लावत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. येथे चार दिवस झाले पाणी नसल्याने टॅंकर आणण्यासाठी पर्यायी मार्ग नाही. याकडे महापालिकेचे लक्ष नाही. महापालिकेने ही कामे लवकर करून घेतली पाहिजे. 
- शारदा 

Image may contain: outdoor

खचलेले चेंबरचे झाकण दुरुस्त करा 
भवानी पेठ : भवानीमाता मंदिर येथील रस्त्यावरील चेंबर खचलेले असून, या मार्गावरून पीएमपी बस, रिक्षा, चारचाकी गाड्या, दुचाकी वाहने आदींची वर्दळ असते. रात्री अंधारात हे धोकादायक खचलेले चेंबर दिसले नाही तर अपघात घडू शकते. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर हे खचलेले चेंबरचे झाकण दुरुस्त करावे. 
-विजय जगताप 

सद्‌गुरू हाइटस सोसायटीत 
रंगला स्नेहमेळावा 

आंबेगाव खुर्द : येथील जांभूळवाडी रस्त्यावरील श्रीसद्‌गुरू सहकारी सोसायटीचा स्नेहमेळावा झाला. या वेळी विकसक विकास हजारे, ऍड. अक्षय भावसार, स्थापत्य अभियंता अमोल सावंत, माजी अध्यक्ष अमोल भावसार, माजी सचिव नीलेश पगार, नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश मोरे, सचिव बाळासाहेब नलावडे, खजिनदार कैलास कोकंदे, चंद्रकांत गुरव यांचा भव्य सत्कार करण्यात आला. 
या प्रसंगी रहिवाशी गोरखनाथ गोरे यांनी आपले सुखद अनुभव सांगितले. सचिव बाळासाहेब नलवडे यांनी सूत्रसंचलन केले. अध्यक्ष गणेश मोरे यांनी आभार मानले. खजिनदार कैलाश कोकंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीलेश पगार, कमलेश आणि रेश्‍मा वेताळ, गणेश मोरे, बाळासाहेब नलावडे, तसेच प्रफुल्ल जाधव आदींनी प्रयत्न केले. 
-चंद्रकांत गुरव 

Image may contain: 2 people, people standing and indoor

 

स्वारगेट : येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ओव्हर ब्रिजच्या उद्‌घाटनाची माहितीफलक चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आली आहे. 
-अतुल शहाणे 

Image may contain: one or more people and people standing

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The danger of putting grains to pigeons