धोकादायक उघडे दरवाजे

सकाळ संवाद
Tuesday, 11 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

No photo description available.

सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथे नित्यानंद हॉलच्या गल्लीमध्ये नारायण कॉम्प्लेक्‍सशेजारी असणाऱ्या ट्रान्स्फार्मरच्या कुंपणाचा दरवाजा मागील अनेक महिन्यांपासून गायब झालेला आहे. तेथील डीपी बॉक्‍सचे दोन्ही दरवाजे उघडे ठेवण्यात आलेले आहेत. लहान मुले खेळताना आतमध्ये जाऊन मोठा अपघात होऊन जिवावर बेतण्याची शक्‍यता आहे. हा दरवाजा त्वरित बसविण्यात यावा व डीपीचे दोन्ही दरवाजे बंद करावेत. 
- गोराडे 

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करा 
पुणे : शहरात खासगी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रत्येक रस्त्याला, चौकात सिग्नलला लाखो वाहने आहेत. वाहतूक विभागाने दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. पुण्यात जसे बेशिस्त वाहनचालक आहेत, तसे हजारो शिस्तबद्ध व वाहतूक नियम पाळणारेही आहेत. सिग्नल लागल्याने वाहनचालक थांबतात; परंतु चौकातून डावीकडे वळण्यासाठी सिग्नल असतानाही मागील वाहनचालक जोरात हॉर्न वाजवून नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना त्यांची गाडी पुढे घ्यायला अथवा पांढऱ्या पट्यावर घ्यायला भाग पाडतात. विनाकारण दोष नसणाऱ्या वाहनचालकांना मोठा दंड सोसावा लागतो. 
- राजन भोसले 
 
कोथरूडमध्ये झाडे गेली; राहिले फक्त खड्डे 
पौड फाटा : पौड फाटा ते कर्वे पुतळा या दरम्यान पदपथांवर झाडे लावण्यात आलेली आहेत; पण त्यांची निगराणी नीटपणे घेतली जात नाही. मुळात पेव्हिंग ब्लॉक उकरून चौकोनी खड्डे करून झाडे लावलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी पाण्याअभावी रोपे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. "झाडं लावा, झाडं जगवा' याप्रमाणे काम न होता केवळ झाडे लावण्याचे काम झालेले आहे. मृत्युंजयेश्‍वर मंदिराजवळील पदपथावर आता फक्त खड्डेच राहिले आहेत. रोपे नष्ट झालेली आहेत. करदात्यांच्या पैशाचा असा "विनियोग' निश्‍चितच योग्य नाही. झाडे लावताना त्यांची निगराणीही तेवढीच महत्त्वाची आहे, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. 
- विकास मुळे 

Image may contain: outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous open doors