माणिकबागेत धोकादायक पत्रे 

सकाळ संवाद
Tuesday, 3 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

माणिकबागेत धोकादायक पत्रे 
माणिकबाग : येथील एका कंपनीने सीमा संरक्षक भिंत म्हणून लावलेल्या पत्र्यांची दुरवस्था झाली आहे. ते अर्धवट निघाले आहेत व त्यामुळे पादचारी व सायकल मार्गावर धोका निर्माण झाला आहे. संबंधित कंपनीने त्वरित या ठिकाणाची दुरुस्ती करून संभाव्य अपघातापासून नागरिकांचा बचाव करावा, तसेच पालिका प्रशासनाने याचा पाठपुरावा करावा. 
- संस्कृती तोरकडी 

 

Image may contain: tree and outdoor

 

सकाळ संवाद कौतुकास्पद 
पुणे : सकाळच्या दर्जेदार साहित्यातून, लिखाणातून अनेकांना ऊर्जा मिळालेली आहे. माझे व सकाळ वृत्तपत्राचे लिखाणाच्या माध्यमातून जुने ऋणानुबंध आहेत. काळाच्या ओघात काही बदल अपरिहार्यपणे होणे गरजेचे आहे. तरीही सकाळ-संवाद ची भूमिका स्तुत्य व कौतुकास्पद आहे. या सदरातून शहरातील तसेच उपनगरांतील नवोदित लेखक, वाचकांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळत आहे. सर्वसामान्य वाचकही आजूबाजूच्या नागरी समस्या नेमकेपणाने टिपू लागला आहे. त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक उपक्रमांबद्दलही माहिती देण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. सकाळ-संवाद हे मर्मबंधातील ठेव आहे. 
-एकनाथ लंघे 

दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला आरोग्य सेवा द्या 
खडकवासला : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची डागडुजी सुरू आहे. येथील फरशा बदलण्यात येत आहे; तसेच भिंतीची दुरुस्ती, जुन्या जाळ्या बदलून नवीन टाकणे अशी कामे सुरू आहेत. परंतु, कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय. फरशांच्या खाली मोठी खडी टाकून त्यावर काम सुरू आहे. अशी कामे करून दर दोन वर्षांनी फरशा खराब झाल्या की त्या बदलण्यात येतात व डागडुजीच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जातो. करोडो रुपये डागडुजीच्या नावाखाली खर्च करून देखील दवाखान्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. तसेच अनेकदा विविध दवाखान्यांत निवासी डॉक्‍टर राहत नसल्याने रात्रीच्या वेळी दाखल होणाऱ्या रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तरी ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे व दिल्ली सरकारने तेथील जनतेला ज्याप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, हीच अपेक्षा. 
- विजय मते 

 

साई पूरम सोसायटीच्या गल्लीमध्ये अस्वच्छता 
नऱ्हे : नऱ्हे रस्त्यावरील साई पूरम सोसायटीच्या गल्लीमधे साफसफाईचे काम नियमित पणे होत नाही. त्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. ऑनलाइन तक्रार केली असता संबंधित काम पूर्ण झाले, असा खोटा संदेश पाठवून ती तक्रार बंद केली जाते. या संदर्भात पालिका आयुक्तांनी लक्ष घालावे. 
- सचिन जाधव 

Image may contain: shoes, tree and outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous Patra in Manikabag