esakal | सिंहगड रस्त्यावरील 'डिजिटल बोर्ड'कडे लक्ष द्यावे!
sakal

बोलून बातमी शोधा

kothrud

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सिंहगड रस्त्यावरील 'डिजिटल बोर्ड'कडे लक्ष द्यावे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या मान्यतेने उभा केलेला डिजिटल बोर्ड एकतर रस्त्याच्या समांतर रेषेत उभा केलेला आहे. यामुळे लगतच्या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्यांना त्यावरील जाहिराती नीट दिसत नाहीत. त्या वाचता - बघता येत नाहीत. त्यासाठी तो थोडा तिरप्या रेषेत लावणे आवश्यक आहे. शिवाय त्याचा विद्युत प्रवाह हा टाईमरच्या साहाय्याने नियंत्रीत करण्यात यावा. ज्यायोगे दिवसाच्या उजेडात वीज पुरवठा खंडित होईल आणि केवळ सायंकाळी अंधार पडण्याची वेळ झाल्यावर तो सुरू होईल. वीजेचा अपव्यय टाळण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. दिवसाच्या प्रखर प्रकाशात बोर्डवरील मजकूर, चित्रे, व्हिडिओ दिसत नाहीत आणि वापरलेली वीज वाया जात आहे. संबंधित व्यक्ती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. 