"स्वच्छ सर्वेक्षण' नंतर राबवा  प्रथम कचरा कंटेनर खाली करा 

सकाळ संवाद
Wednesday, 5 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

"स्वच्छ सर्वेक्षण' नंतर राबवा 
प्रथम कचरा कंटेनर खाली करा 

शिवाजीनगर : महापालिकेच्या अधिकृत टोल फ्री आणि व्हाट्‌सऍप नंबरवर वारंवार तक्रार नोंदवूनही शिवाजीनगर येथील लालबहादूर शास्त्री शाळेलगतचा कचऱ्याचा कंटेनर अजूनही हटवला गेलेला नाही. दिवसभर कचरा रस्त्यावर ओसंडून वाहत असतो. "स्वच्छ सर्वेक्षण'चा एवढा गाजावाजा करायचा, भिंती रंगविण्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करायची, त्यानिमित्ताने जनतेच्या पैशातून भ्रष्टाचार करायचा, मात्र वारंवार कळवूनही कंटेनर तसेच भरून वाहू द्यायचे, याला काय म्हणावे? सध्याच्या रोगराईयुक्त वातावरणात पालिकेच्या घोले रस्ता कार्यालयाला स्वच्छतेचे काहीही गांभीर्य दिसत नाही. शिवाय गल्ली अरुंद असल्याने रहदारीसही अडथळा होत आहे. स्वच्छ आणि निरोगी परिसर राखण्याचा नागरिकांचा हक्क अतिशय निष्काळजीपणाने डावलला जातोय. नवीन आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्वरित दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. 
- सुदर्शन परब 

Image may contain: tree, plant and outdoor

 

यशोदीप विद्यालयात प्रजासत्ताक दिन 
वारजे मारवाडी : वारजे माळवाडी यशोदीप प्राथमिक विद्यालय, यशोदीप माध्यमिक विद्यालय व यशोदीप इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजवंदन महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक सचिन दोडके, सामाजिक कार्यकर्ते कैलास दांगट, माजी जिल्हा परिषद सदस्य बोरखडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सोनवणे, नामदेव पवळे, उद्योजक सतीश पाटील, अशोकराव गलांडे, कमलाकर गलांडे आदी उपस्थित होते. 
पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका नीता गुंजीकर, व्यंकटेश देशमुख व आसावरी मुजुमदार यांनी केले. या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षिसे देऊन अभिनंदन केले. सूत्रसंचालन आनंदराव ढालपे, भगत व सुनील गायकवाड यांनी केली. व्यंकटेश देशमुख यांनी आभार मानले. 
- व्यंकटेश देशमुख 
 

शिवशाही कॉलनीत कार्यक्रम 
वारजे माळवाडी : शिवशाही कॉलनी अमृतवेल सोसायटीजवळ येथे ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आबाल-वृद्धांपासून परिसरातील सर्व मंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक दत्तात्रय पायगुडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अमोल बगाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल ठाकर, अविनाश चतुर, उद्योजक पवनशेठ धुमाळ, एस. के. फार्माचे अजित पायगुडे, शिक्षक सोनार, सातपुते, कालिदास चतुर, विकास चतुर, पुंडलिक ठाकर, अमित पायगुडे, शंकर गुरव, शैलेश पाटील, रामचंद्र सावंत, पवार, ज्येष्ठ नागरिक किसन ठाकर, उल्का कदम, शमिका ठाकर, श्रीमती पाटील, चोरगे, प्रतिभा ठाकर, गीता नेगी, विजया पाटील, कांचन देशमुख, रोहिणी चतुर, वीणा चतुर आदी उपस्थित होते. 
- अमोल बगाडे 

Image may contain: one or more people and outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do a 'clean survey' later. Empty the previously filled trash