मुलांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला

सकाळ संवाद
Sunday, 9 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

बिबवेवाडी : महापालिकेच्या शाळा क्र.30 जी व 39 बी यांची वार्षिक सहल सोमेश्वर वाडी बाणेर, चर्तूशृंगी या ठिकाणी गेली होती. मुलांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. 
- संदीप पलांडे 

Image may contain: 12 people, outdoor

 

स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणे 
नागरिकांची जबाबदारी
 
कोथरूड : कर्वे रस्त्यावर मृत्युंजय मंदिराच्या पुढे स्त्रियांसाठी स्वच्छतागृह होते; परंतु पुरुष उघड्यावर लघुशंका करतात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते अशी बातमी "सकाळ संवाद'मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले. त्यामुळे पुरुषांचे बाहेर लघुशंका करणे बंद झाले आहे. आतून बाहेरून छान टाइल्स बसवून परिसर अगदी स्वच्छ व देखणा केला आहे. या ठिकाणी महापालिकेने एक कर्मचारी नेमला आहे, त्यामुळेही परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत आहे. अपंगांसाठीही येथे सोय केली आहे. एवढे स्वच्छ व सुंदर स्वच्छतागृह तंबाखू, गुटखा खाऊन थुंकून परिसर अस्वच्छ करू नये. ही जबाबदारी नागरिकांचीही आहे. यासाठी येथील नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांचे व "सकाळ'चे मन:पूर्वक आभार. 
- शिवाजी पठारे 
 

Image may contain: people standing, sky and outdoor

नदीपात्रात जुन्या विद्युत खांबांचा राडारोडा 
नदीपात्र : नदीपात्रात राडारोडा टाकू नये, यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. पण या मोहिमेलाच प्रशासनाने हरताळ फासला आहे. शहरात डिझायनर विद्युत खांब बसवून शहर स्मार्ट सिटी होणार आहे का.? आणि जे जुने खांब आहेत त्याचे काय करायचे? यावर कोणताच विचार प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे रस्त्यांवर, गल्लीबोळात, पदपथांवर आणि आता तर चक्क बाबा भिडे पुलाशेजारील नदीपात्रात जुने विद्युत खांबांचा ढीग पडून आहे. त्यामुळे ते गंजून भंगारात जाणार ! पण हे भंगार सुद्धा एकत्र करून विकल्यास महसूल गोळा करण्यासाठी महापालिका प्रशासन तसदी घेत नाही. त्यामुळे नागरिकांच्या करातून केलेल्या विकासकामांवर फक्त उधळपट्टी करण्याचे धोरण प्रशासनाचे आहे का? नियोजनाचा अभाव, पारदर्शकता कोणत्याच कामात नसल्यामुळे विकासाच्या नावाखाली खेळखंडोबा सुरू आहे. यावर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वसामान्य माणूस काबाडकष्ट करुण कळत नकळत अनेक प्रकारचे कर भरतो. पण त्याला मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे फायदे सुखसुविधा मात्र घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, कर्मचारी एकत्र असतात. आता सातव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे. आता तरी विकास कामांवर नियोजन व पारदर्शकतेचा प्रभाव दाखवून टिकाऊ कामे करावीत. 
- अनिल अगावणे 
 

Image may contain: one or more people, tree, outdoor and nature

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Educational trip