#WeCareForPune पदपथावरील अतिक्रमणाचा प्रश्न केव्हा सुटणार?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : कर्वे रस्त्यावर कर्वे पुतळा चौकात या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहे. या हातगाड्या पूर्वी महर्षि कर्वे स्मारकाजवळ होत्या. स्मारकाचे नुतनीकरण झाल्याने त्या पदपथावर हलविल्या आहेत. हातगाड्या व खाणाऱ्यांची गर्दी यामुळे फुटपाथवरून चालता येत नाही. ही पादचाऱ्यांच्या हक्काची पायमल्ली आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ शिजविणे व विकणे कायद्याने गुन्हा असूनही येथे कायद्याचे उल्लंघन राजरोसपणे सुरू आहे. या अन्नाचा दर्जा तरी तपासला जातो का? मोठ्या हॉटेलवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडेही लक्ष द्यावे. महापालिकेने फुटपाथवरील हे अतिक्रमण हटवून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे.

*********************************************************************************************
सोसायटीच्या समोरील रस्त्यावर अतिक्रमण 

कोथरुड येथील  रामकृष्ण परमहंसनगरमधील सीमा गार्डन सोसायटी समोर, उत्सव हॉल जवळ, अबोली व्हीला सोसायटीच्या समोरील अतिक्रमणांवर त्वरीत कारवाई करावी. सदर सोसायटीच्या समोर महापालिकेचा रस्ता असून त्यावर नेहमीच वर्दळ असते. सदर जागेत अतिक्रमण करून वडापाव, चहाची गाडी लावली आहे. अवैध पद्धतीने व्यवसाय करत असून सोसायटीचे पाणी, स्वच्छतागृह याचा मुक्त हस्ते वापर करत आहे

सदर व्यक्ती पूर्वी सोसायटीच्या जागेत बेकायदेशररित्या व्यवसाय करित असे. सोसायटी ने महापालिकेत तक्रार करून पाठपुरावा करुन त्याला हुसकून लावले होते. पण आता प्रशासनाने कहर केला आहे त्याला हातगाडीचा परवाना दिला आहे. सोसायटीमध्ये दिवसभर लहान मुले खेळत असतात त्यांना गरम तेलाने नुकसान पोहचू शकते. सदर गाडीमुळे सोसायटी समोर वर्दळीच्या वेळी अडथळा होतो. तसेच रोड रोमिओ व टवळके येथे ठाण मांडून बसतात. वेळेत कारवाई न केल्यास अजून गाडीवाले इथे जमतील. त्रास वाढेल सदर जागा पूर्णपणे रहिवासी झोन आहे. आपण यावर कारवाई करावी आणि कायमचा बंदोबस्त करावा.
उमेश आपटे

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment of food handpumps on the pavement