फुटपाथवर पत्रे लावून अतिक्रमण

शिवाजी पठारे 
बुधवार, 13 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कोथरूड-कर्वे रोडवर महर्षी कर्वे पुतळा चौकात जलसंपत्ती भवनच्याशेजारी व सुजाता मस्तानी समोर एका इमारतीचे काम सुरू असून बिल्डरने फुटपाथवर पत्रे लावून फुटपाथच अनेक महिन्यांपासून बंद केला आहे. त्याशेजारीच दुचाकी पार्क केल्या जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना निम्म्या रस्त्यावरून चालावे लागते. याठिकाणी कधीही अपघात होऊ शकतो. महापालिकेने याची दखल घेऊन सदर फुटपाथ बंद करणाऱ्यावर कारवाई करून फुटपाथ रिकामा करावा व पादचाऱ्यांच्या हक्काचे रक्षण करावे.  

Web Title: Encroachment on footpath

टॅग्स