कल्याणी नगर चौकात फुटपाथवर अतिक्रमण

प्रशांत सानप पाटील
शुक्रवार, 20 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कल्याणी नगर (पुणे) : कल्याणी नगर चौकापासून बिशप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर भाजीवाले, भेळवाले व फुले विकणाऱ्या फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.

पादचाऱ्यांना गर्दीच्या वेळी रस्त्यावरून चालाताना कसरत करावी लागते.  त्यामुळे येथे वाहतुककोंडी होते. या ठिकाणी महानगरपालिकेने अतिक्रमण हटवून पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करावेत. तसेच उलट दिशेने अनेक वाहने येतात त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. चौकातील वाहतूक पोलिस या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.

Web Title: encroachment on kalyani nagar footpath