कोरेगाव भीमा घटना आणि बोध

अजिंक्य तेरखेडकर
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोरेगाव भीमा येथे घडलेला प्रसंग आणि त्यामुळे महाराष्ट्रभर घडलेला प्रकार हा आपणास अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. एखादी घटना आणि त्यामुळे समाजातील काही लोकांमधे जर तेढ निर्माण होत असेल तर अशा घटनांना आपण किती खतपाणी घालायचे हे आपण ठरवायला पाहिजे. समाज माध्यमातून फोटो व्हीडीओ किंवा घटनेची माहिती प्रसारित करताना आपण विचार केला पाहिजे. एखाद्या अन्यायकारक घटनेचा निषेध जरूर करावा पण त्यामुळे आपल्या समाजात दूही माजेल असे नक्कीच करू नये. राजकारणी लोकांना तेच पाहिजे. त्यासाठी अशा घटना घडवल्या आणि चिघळवल्या जातात. यात डोकी फुटतात रक्त सांडते आर्थिक नुकसान होते ते सर्व कधी काळी आपले भाऊबंध, मित्र, शेजारी असतात. अन्यायकारक घटनांविरूद्ध लढा जरूर लढावा पण कायदा हातात घेऊ नये. आपण कायदा हातात घ्यावा आग लागावी आणि आपण त्यावर आपली पोळी भाजून घ्यावी हा एकमेव उद्देश समाज कंटकांचा असतो. अशांना बळी पडू नका सारासार विचार करा विचारांची लढाई विचारांनी लढावी आणि अन्यायाविरूद्ध कायद्याची लढाई लढावी.

Web Title: Esakal Citizen Journalism Ajinkya Terkhedkar writes about koregaon bhima Violence